Champions Trophy 2025: टीम इंडियाचा ‘बाहुबली’ शुभमन गिल, 1 शतक, अनेक विक्रमांची नोंद
शुभमन गिल वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज म्हणून उदयास आला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये त्याची कामगिरी लक्षणीय आहे. त्याची या फॉरमॅटमध्ये सरासरी 60 पेक्षा अधिक आहे. सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून भूमिका बजावत आहे. आता क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून निवृत्त झाल्यास गिल हा पुढील वनडे कर्णधार पदाचा दावेदार होऊ शकतो.
बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात शुभमन गिलने नाबाद 101 धावांची खेळी साकारत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. याच सामन्यात मोहम्मद शमीने 5 बळी घेत बांगलादेशला 228 धावांत रोखले. या शानदार कामगिरीमुळे गिलने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये (51) आठ शतके झळकावण्याचा विक्रम आपल्या नावे केला.
शुभमन गिलची वनडे क्रिकेटमध्ये होत असलेले सातत्यपूर्ण कामगिरी पाहता तो भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो. गिलने मागील काही सामन्यांमध्ये उल्लेखनीय धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध अहमदाबादमध्ये 112 धावांची खेळी केली होती. तसेच कटक व नागपूरमध्ये अनुक्रमे 60 व 87 धावा करून आपल्या ‘क्लास’चा दाखला दिला आहे.
हेही वाचा - 'पाकिस्तान भारताला हरवणार' IITian बाबाचं भाकीत
बुमराह की गिल टीम इंडियाचा पुढील वनडे कर्णधार कोण?
माजी क्रिकेटर संजय मांजरेकर आणि अनिल कुंबळे यांनी क्रिकइन्फोवर बोलताना वनडे कर्णधाराविषयी भाष्य केलं. यात जसप्रीत बुमराह हा गिलपेक्षा अधिक योग्य पर्याय असू शकतो, असं मांजरेकर म्हणाले. बुमराह सध्या दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे गिलला उपकर्णधारपद दिले गेले. जर बुमराह फिट असता तर तो भारतीय संघाचा उपकर्णधार झाला असता, असेही मांजरेकर यांनी म्हटलं. कुंबळे यांनी मांजरेकर यांचं म्हणणं मान्य केलं. वनडे क्रिकेट आता कमी खेळले जात आहे. पण पुढील वर्ल्ड कप २०२७ मध्ये होणार आहे, त्यामुळे पुढील कर्णधाराची निवड महत्त्वाची ठरणार आहे. यात बुमराह चांगली चॉईस आहे. पण गिल देखील यामध्ये मागे नाही.
हेही वाचा - Shikhar Dhawan : शिखर धवनसोबतची 'ती' गॉगलवाली तरुणी कोण?, सोशल मीडियावर चर्चा
गिलचे आंतरराष्ट्रीय आकडे
टेस्ट क्रिकेट: 32 सामने 59 डाव 1893 धावा 35.05 सरासरी
वनडे क्रिकेट : 51 सामने, 51 डाव, 2688 धावा, 62.51 सरासरी
टी20 क्रिकेट: 21 सामने, 21 डाव, 578 धावा, 30.42 सरासी
टीम इंडियासाठी कमी डावात 8 शतक झळकावणारे खेळाडू
शुभमन गिल - 51 डाव
शिखर धवन - 57 डाव
विराट कोहली - 68 डाव
गौतम गंभीर - 98 डाव
सचिन तेंडुलकर - 111 डाव