कोलकाता येथे पार पडलेला दक्षिण आफ्रिक विरुद्ध भारत या कसोटी सामन्यात भारताला पहिल्या कसोटी सामन्यात तीन दिवसांतच 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यावेळी दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अवघ्या 1-0 अशी आघाडी घेतली. एवढचं नव्हे तर दक्षिण आफ्रिकेने हा सामना 30 धावांनी जिंकला. या कसोटी मालिकेचा दुसरा सामना गुवाहाटी येथे 22 नोव्हेंबरपासून खेळला जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 124 धावांचे लक्ष्य भारताला पार करता आले नाही आणि तीन दिवसांतच 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत पुनरागमन कराव लागणार आहे. मात्र सामन्यापुर्वीच टीम इंडियाविषयी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
यावेळी कर्णधार शुभमन गिलच्या फिटनेसबद्दल बोलायचं झालं तर, संघासाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. कर्णधार शुभमन गिलला रविवारी रात्री कोलकाता येथील वुडलँड्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुभमन गिल 19 नोव्हेंबर रोजी टीम इंडियासह गुवाहाटीला रवाना होणार असला तरी, तो खेळेल की नाही याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.
तर दुसरीकडे टीम इंडियातील युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या कसोटी संघात सामील झाला आहे. नितीश कुमार रेड्डी हा इंडिया अ संघासोबत राजकोटमध्ये होता, परंतु दुसऱ्या कसोटीपूर्वी त्याला कसोटी संघात परत बोलावण्यात आले आहे. पहिल्या कसोटीपूर्वी त्याला सोडण्यात आले होते, परंतु आता संघ व्यवस्थापनाने असे संकेत दिले आहेत की तो दुसऱ्या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
त्याचसोबत दक्षिण आफ्रिकेच्या संघातही एक बदल करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा सराव दरम्यान बरगडीच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकला. त्याच्याऐवजी आता वेगवान गोलंदाज लुंगी न्गिडीला संघात घेण्यात आलं आहे. दरम्यान कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला अडचणींचा सामना करावा लागला तरी टीम इंडिया यावेळीस बाजी मारणार का? यासाठी सर्वांचे लक्ष आता गुवाहाटी कसोटीवर आहे.