हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात वीस - वीस षटकांच्या सामन्यांची मालिका सुरू आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेत दोन सामन्यांनंतर बरोबरी झाली आहे. झिम्बाब्वेने पहिला सामना १३ धावांनी जिंकला तर भारताने दुसऱ्या सामन्यात १०० धावांनी दणदणीत विजय मिळवला. मालिकेतील तिसरा सामना बुधवार १० जुलै रोजी तर चौथा सामना शनिवार १३ जुलै रोजी होईल. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रविवार १४ जुलै रोजी होणार आहे.