IND vs AFG T20: भारत-अफगाणिस्तान T20 मालिकेची घोषणा; वैभव सूर्यवंशीला मिळाली मोठी संधी

या संघ निवडीत सर्वात मोठा निर्णय म्हणजे तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशीचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

IND vs AFG T20: भारत-अफगाणिस्तान T20 मालिकेची घोषणा; वैभव सूर्यवंशीला मिळाली मोठी संधी

IND vs AFG T20: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 15 सदस्यीय भारतीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या महत्त्वाच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यर याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून तिलक वर्मा उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. 

या संघ निवडीत सर्वात मोठा निर्णय म्हणजे तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशीचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. या मालिकेतील पहिला T20 सामना 13  सप्टेंबर रोजी दिल्लीतील ऐतिहासिक अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आगामी स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा – Lionel Messi : महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा; भावनिक पोस्ट करत केली घोषणा

युवा आणि अनुभवी खेळाडूंचा संतुलित भरणा; गोलंदाजीत जसप्रीत बुमराहचे नेतृत्व

निवड समितीने या मालिकेसाठी युवा जोश आणि अनुभवी खेळाडूंचा उत्तम मेळ घातला आहे. फलंदाजीची धुरा श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन आणि संजू सॅमसन यांच्यावर असणार आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश करून संघाला अधिक मजबूती देण्यात आली आहे. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई हे सांभाळतील. तर वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा अफगाणिस्तानच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 मालिकेसाठी घोषित झालेला संपूर्ण भारतीय संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, ईशान किशन, तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number