Sunday, November 16, 2025 05:27:45 PM

IND-W vs SA-W Final: भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य; शेफाली आणि दीप्तीने झळकावले अर्धशतक

टीम इंडियाने 50 षटकांत 7 गडी गमावून 299 धावा केल्या. आता भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं लक्ष्य दिलं आहे.

ind-w vs sa-w final भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य शेफाली आणि दीप्तीने झळकावले अर्धशतक

IND-W vs SA-W Final: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा अंतिम सामना रंगत आहे. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाने 50 षटकांत 7 गडी गमावून 299 धावा केल्या. आता भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं लक्ष्य दिलं आहे.  वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या नव्या विजेत्याचा निकाल 50 षटकांच्या उर्वरित सामन्यात लागणार आहे. 

भारतीय संघाने दमदार सुरुवात केल्यानंतर काही महत्त्वाचे गडी गमावले असून सध्या संघ मधल्या टप्प्यावर आहे. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्या शानदार भागीदारीनंतर भारताने पहिल्या विकेटसाठी मजबूत पाया रचला. शेफाली वर्माने 78 चेंडूत 87 धावा काढल्या, पण ती शतकाच्या उंबरठ्यावर बाद झाली. ती विश्वचषक फायनलमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय फलंदाज ठरण्यापासून फक्त 13 धावांनी दूर राहिली. तिच्या विकेटनंतर भारताचा दुसरा गडी 166 धावांवर गेला.

हेही वाचा - IND vs AUS 3rd T20: वॉशिंग्टन सुंदरची तुफानी खेळी! टीम इंडियाकडून तिसऱ्या टी20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव

यानंतर जेमिमा रॉड्रिग्जनेही प्रभावी फलंदाजी करत 24 चेंडूत 37 धावा केल्या, पण तीही ऐबोंगा खाकाच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्या वेळी भारताचा स्कोअर 3 बाद 172 असा होता. कर्णधार हरमनप्रीत कौर 20 धावा करून क्लीन बोल्ड झाली, तर दीप्ती शर्मा सध्या 43 धावांवर खेळत आहे. अमनजोत कौर 12 धावा करुन बाद झाली.  त्यामुळे भारताचा पाचवा विकेट 245 धावांवर पडला. सध्या 44 षटकांनंतर टीम इंडियाचा स्कोअर 253 धावांवर 5 विकेट असा होता. हा सामना भारतासाठी ऐतिहासिक ठरू शकतो, कारण संघाला महिला विश्वचषकातील पहिलं विजेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.  
 


सम्बन्धित सामग्री