Thursday, November 13, 2025 01:06:47 PM

Women World Cup Final: नवी मुंबईत आज वर्ल्डकप फायनल; पावसाचे विघ्न ठरवणार का सामन्याचं भविष्य?

नवी मुंबईत आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषकाची फायनल लढत होणार आहे. हवामान, ड्यू आणि टॉस हा सामना पलटवणारे मोठे फॅक्टर्स ठरू शकतात. हाय स्कोअरिंग मॅचचीही शक्यता.

women world cup final नवी मुंबईत आज वर्ल्डकप फायनल पावसाचे विघ्न ठरवणार का सामन्याचं भविष्य

Women World Cup Final: महिला वनडे क्रिकेट विश्वचषकाचा ‘ग्रँड फिनाले’ आज नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन सशक्त संघांमध्ये विजेतेपदासाठी जबरदस्त भिडंत अपेक्षित आहे. लीग स्टेजमध्ये या दोघांची जेव्हा टक्कर झाली होती, तेव्हा सामना थरारक राहिला आणि अखेर आफ्रिकेने 3 विकेट्सने विजय मिळवला होता. त्या पराभवाची सल भारतीय खेळाडूंना नक्कीच आज प्रेरणा देणार आहे. कारण हा फक्त सामना नाही… तर हा ऐतिहासिक संधीचा क्षण आहे. पहिल्यांदाच विश्वचषक जिंकण्याची.

यावेळी मैदानावरील खेळाइतकेच एक वेगळे फॅक्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे नवी मुंबईचे हवामान; 2 नोव्हेंबरच्या संध्याकाळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सायंकाळी चार ते सातच्या दरम्यान पावसाची शक्यता 50 टक्क्यांपेक्षा जास्त सांगितली जात आहे. त्यामुळे सामन्याचा वेग अधूनमधून खंडित होण्याची भीती असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे दिवसभरात उष्णता आणि दमट वातावरणाचा अनुभव राहील. परंतु सूर्य मावळण्यासोबत तापमान थेट 25 डिग्री सेल्सियसपर्यंत झुकू शकते.

हेही वाचा: Womens Worldcup Final Tickets : क्रीकेटप्रेमींमध्ये नाराजी ! अंतिम सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच विकली आणि...

या सामन्यात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ड्यू (दव) होणार आहे. रात्रीच्या वेळी डी. वाय. पाटील मैदानावर ड्यू प्रभाव जास्त जाणवतो गेल्या मॅचेसमध्येही हे दिसून आले. त्यामुळे टॉस जिंकणाऱ्या संघाकडून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेण्याची शक्यता फार मोठी आहे. दुसऱ्या डावात ओलसर चेंडूने गोलंदाजांचे नियंत्रण घसरते आणि त्याचा सरळ फायदा फलंदाजांना मिळतो.

या विश्वचषकात या मैदानावर झालेले सामनेही तसा उच्च स्कोअरचा ट्रेंड दर्शवतात. काही सामन्यांत संघांनी मोठे टार्गेट सेट केले, काही वेळा ते यशस्वीरीत्या चेसही झाले. विशेष म्हणजे भारतानेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 339 धावांचे प्रचंड आव्हान पार पाडून इतिहास रचला होता आणि तो अजूनही महिला वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठा यशस्वी चेस म्हणून नोंदवला गेला आहे.

त्यामुळे फाइनलमध्येही हाय-स्कोअरिंग कॉन्टेस्ट दिसणे अजिबात आश्चर्यकारक ठरणार नाही. भारतीय टॉप ऑर्डर सातत्याने रन बनवत आहे, आफ्रिकेचे फास्ट अटॅक बॉल स्विंग करवू शकते… आणि दोन्ही संघांकडे मोठ्या क्षमतेचे ‘फिनिशर’ आहेत.

 


सम्बन्धित सामग्री