India vs Japan: भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक; जपानचा 8 गडी राखून धुव्वा उडवत अवघ्या 30 चेंडूंत जिंकला सामना

भारतीय महिला संघाने आपला दबदबा कायम राखत उपांत्य फेरीत (Semi-Finals) शानदार प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा 8 गडी राखून पराभव करत पूर्णपणे एकतर्फी विजय मिळवला.

India vs Japan: भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक; जपानचा 8 गडी राखून धुव्वा उडवत अवघ्या 30 चेंडूंत जिंकला सामना

India vs Japan:  आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने आपला दबदबा कायम राखत उपांत्य फेरीत (Semi-Finals) शानदार प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा 8 गडी राखून पराभव करत पूर्णपणे एकतर्फी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना जपानचा संपूर्ण संघ 19.5 षटकांत केवळ 57 धावांवर गारद झाला. विजयासाठी मिळालेले 58 धावांचे सोपे लक्ष्य भारतीय संघाने अवघ्या 5 षटकांत, म्हणजेच अवघ्या 30 चेंडूंत 2 गडी गमावून सहज पूर्ण केले.

जपानच्या फलंदाजांचा संघर्ष; श्रीचरणीची फिरकीची जादू

सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर जपानच्या फलंदाजांना अजिबात तग धरता आला नाही. जपानच्या पूर्ण संघाला 20 षटकेही खेळता आली नाहीत. संघातील केवळ दोनच फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले. अयाका काटो-स्टॅफर्डने 47 चेंडूंत सर्वाधिक 25 धावा केल्या, तर सलामीवीर हारुना इवासाकीने 22 चेंडूंत 10 धावा जोडल्या. भारताकडून गोलंदाजीत श्रीचरणीने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या 4 षटकांत अवघ्या 10 धावा देऊन 4 बळी घेतले. तिला उत्तम साथ देत शफाली वर्माने 4 षटकांत 13 धावा देत 2 गडी बाद केले, तर श्रेयांका पाटील आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

शफालीची धडाकेबाज फलंदाजी; 5 षटकांत आव्हानाचा पाठलाग

58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजीत काही बदल पाहायला मिळाले. स्मृती मंधाना ऐवजी कमलिनी सलामीला आली, मात्र तिला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर आलेल्या फूलमालीने 7 चेंडूंत 6 धावा केल्या. मात्र, दुसरीकडून सलामीवीर शफाली वर्माने जपानी गोलंदाजीचा समाचार घेत अवघ्या 15 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 40 धावांची स्फोटक खेळी साकारली. रिचा घोषने 6 चेंडूंत 12 धावा करत संघाला अवघ्या 30 चेंडूंत दणदणीत विजय मिळवून दिला.

हेही वाचा – Abhishek Sharma T20I Century: अभिषेक शर्माचा ऐतिहासिक पराक्रम; अवघ्या 30 चेंडूंत शतक ठोकून मोडला रोहित शर्माचा विक्रम

उपांत्य फेरीत 20 सप्टेंबर रोजी बांगलादेशशी लढत

या दणदणीत विजयासह भारताने अंतिम 4 संघांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त श्रीलंका आणि बांगलादेश या संघांनीही उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता 20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताचा सामना बांगलादेशशी होईल, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल. या सामन्यातील विजयामुळे भारतीय संघ थेट अंतिम फेरीत पोहोचून पदक निश्चित करेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number