Harbhajan Singh: कीर्ती आझाद यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर हरभजन सिंग संतापला, म्हणाला ‘श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करणे…’

टी20 विश्वचषक 2026 जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने ट्रॉफीसह अहमदाबादमधील हनुमान मंदिराला भेट दिली होती.

Harbhajan Singh: कीर्ती आझाद यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर हरभजन सिंग संतापला, म्हणाला ‘श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करणे…’

अहमदाबाद: टी20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला. 8 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या अंतिम लढतीत भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. या विजयामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. मात्र या विजयानंतर घडलेल्या एका घटनेमुळे क्रिकेटविश्वात आणि राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे.

विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव याने  त्याच रात्री आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह अहमदाबादमधील हनुमान मंदिरात जाऊन ट्रॉफीचे दर्शन घडवले. विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी ही भेट दिल्याचे सांगितले जाते. मात्र या कृतीवर काही राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यानंतर हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि सध्या तृणमूल काँग्रेसचे खासदार असलेले कीर्ती आझाद यांनी या घटनेवर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, भारतीय संघात विविध धर्मांचे खेळाडू असतात आणि सर्वजण मिळून संघाला विजय मिळवून देतात. त्यामुळे खेळ आणि धर्म यांना एकत्र जोडणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले. खेळाडूंचा धर्म नसतो, ते फक्त देशासाठी आणि संघासाठी खेळतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Nasa Mars Mission New Photo: मंगळ ग्रहाचे गूढ उलगडणार; नासाने वीस वर्षांनंतर जाहीर केली लाल ग्रहाची नवीन आणि अत्यंत स्पष्ट छायाचित्रे

कीर्ती आझाद यांच्या या वक्तव्यावर आता भारताचे माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हरभजन सिंग म्हणाला की, खेळ आणि राजकारण यांना वेगळे ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीची श्रद्धा असेल तर तो मंदिरात, गुरुद्वार किंवा इतर कुठेही जाऊ शकतो आणि त्यावर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही.

हरभजन सिंग पुढे म्हणाला की, जर सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांनी विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ट्रॉफीसह मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला असेल, तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. कोणीतरी मनोमन काही मागितले  असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी ते कुठेही जाऊ शकतात. त्यामुळे अशा गोष्टींवर अनावश्यक वाद निर्माण करणे योग्य नाही, असे त्याने स्पष्ट केले.

दरम्यान, 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिलेले कीर्ती आझाद यांनी पुन्हा एकदा सांगितले की, त्यांनी खेळताना कधीही क्रिकेटला धर्माशी जोडले नाही. त्यांच्या मते, खेळाडूंची ओळख त्यांच्या कामगिरीवरून असते, धर्मावरून नव्हे. त्यामुळे खेळ हा सर्वांना जोडणारा असावा, विभाजन करणारा नव्हे.

टी20 विश्वचषक विजयाच्या आनंदात सुरू झालेली ही चर्चा आता श्रद्धा, खेळ आणि सार्वजनिक प्रतिमेच्या मुद्द्यांवर व्यापक वादाचा विषय ठरली आहे. मात्र क्रिकेटप्रेमींच्या मते, या सर्व वादांपेक्षा भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाचे महत्त्व अधिक मोठे आहे.

हेही वाचा: SSC Paper Leak: दहावी परीक्षेच्या 3 दिवस आधीच गणिताच्या प्रश्नपत्रिका टेलिग्रामच्या ग्रुपवर, अॅडमिनवर गुन्हा दाखल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number