मुंबई: भारत 20 फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामना असून दुपारी 2.30 वाजता सुरु होणार आहे. दुबाईचं मैदान वेगवान गोलंदाजीसाठी उत्तम मानले जाते. या मैदानात सरासरी धावसंख्या 218 आहे. दुबईमध्ये झालेल्या गेल्या 56 एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 22 वेळा संघ जिंकला आहे. तर द्वितीय फलंदाजी करताना 34 वेळा संघ जिंकला आहे. गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या परिस्थितीमुळे भारतीय गोलंदाजांचं काम थोडा सोपं होऊ शकतं. भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराहची उणीव भासेल का ? हा प्रश्न सर्वांच्या मुखावर आहे. भारतीय संघाचा फलंदाजांकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर चांगल्या लयीत दिसत आहेत. भारताला जिंकायचं असेल तर हार्दिक पांड्याला उत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आहे.
बांगलादेश संघाची गेल्या ५ वर्षाची कामगिरी ही अगदी साधारण राहिली आहे. त्यात, तमीम इकबाल आणि शाकिब अल हसनचं संघात नसणं बांग्लादेशच्या सामना जिंकण्याच्या अपेक्षा अजून मंदावतात. बांगलादेशचा संघ मेहदी हसन,महमूदउल्लाह आणि मुशफिकूर रहिमवर निर्भर असताना भासतो. यापूर्वी बांगलादेशने भारतला २००७ च्या विश्व चषकामध्ये हरवलं होतं. त्यामुळे भारत बांगलादेश संघाला अजिबात हल्ल्यात घेणार नाही.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल(यष्टीरक्षक), ऋषभ पंत(यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
बांगलादेश संघ: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्या सरकार, तन्झिद हसन, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम(यष्टीरक्षक), एमडी महमूदउल्लाह, जाकेर अली, मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेज हसन अहमद, परवेज हसन, मुस्तफिजुर रहमान, तनजीद हसन, नज़मीन अहमद, नजमुन हसन. राणा.