मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 मालिका रोमहर्षक वळणावर येऊन ठेपली आहे. भारताला मालिका जिंकण्यासाठी एका विजयाची गरज आहे तर मालिका जिंकायच्या अपेक्षा कायम ठेवण्यासाठी इंग्लंडला चौथा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे.
राजकोट टी 20 सामन्यात इंग्लंड संघाने चांगले प्रदर्शन करून मालिकेत पुनरागमन केले आहे. या सामन्यात इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्यात यशस्वी झाले होते. लिअम लिविंगस्टन आणि बेन डकेट यांनी पहिल्या 2 सामन्यात आपल्या कामगिरीने इंग्लंड संघाला आणि इंग्लंडच्या चाहत्यांना निरशा केलं होतं. पण तिसऱ्या सामन्यात डकेटने 51 तर लिविंगस्टनने 43 धावा केल्या होत्या. तसेच, जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, मार्क वूड आणि ब्रेडन कार्स यासर्व गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली होती. पुनः एकदा हे गोलंदाज अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करतील अशी अपेक्षा इंग्लंड संघ आणि इंग्लंड संघाचे चाहते करतील.
सूर्यकुमार यादवची कामगिरी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. मिस्टर 360 म्हणून ओळखला जाणाऱ्या सूर्यकुमारच्या या प्रतिमेचं दर्शन या मालिकेत अद्यापही झालं नाहीये. त्याच्याकडून मोठी खेळी आल्यास भारतीय संघाची सामना जिंकाची संधी नक्कीच उंचावेल. सूर्यकुमार सोबत मोहम्मद शमीच्या कामगिरीवर सर्वांचंच लक्ष असेल.
गेल्या सामान्यत शमीने त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं. पण त्याची कामगिरी मात्र सामान्य राहिली. गेल्या सामन्यात फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने 5 बळी घेतले होते. भारत सामना हरला होता तरीही वरुणला सामनावीर म्हणून घोषित केलं होतं. त्याच्याकडून उत्तम प्रदर्शनाची अपॆक्षा सर्व भारतीय चाहत्यांना असेल.
सामन्यावर गुइलेन बॅरे सिंड्रोम सावट
पुण्यात वाढत्या गुइलेन बॅरे सिंड्रोम आजारामुळे प्रशासनाला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. प्रशासनाची तयारी कशी आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत. सध्याचा स्तिथीत पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे १०० हुन अधिक रुग्ण आहेत.