Sunday, February 08, 2026 12:18:19 AM

IND vs PAK Asia Cup Final: नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय! हार्दिक पंड्याऐवजी रिंकू सिंगला संधी

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, सामन्याच्या काही मिनिटांपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला.

ind vs pak asia cup final नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय हार्दिक पंड्याऐवजी रिंकू सिंगला संधी

IND vs PAK Asia Cup Final: आशिया कप 2025 चा बहुप्रतीक्षित अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू होणार आहे. या ऐतिहासिक सामन्याची सुरुवात नाणेफेकीने झाली. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, सामन्याच्या काही मिनिटांपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. मागील सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी रिंकू सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. याशिवाय शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह देखील संघात परतले आहेत.

सूर्यकुमारने फोटोशूट टाळले

विशेष म्हणजे, अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे कर्णधार ट्रॉफीसोबत संयुक्त फोटोशूट करताना दिसतात. पण यावेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान आघासोबत फोटोशूट करण्यास नकार दिला. त्यामुळे ट्रॉफीसोबत सलमान आघा एकट्याने फोटो काढताना दिसला.

हेही वाचा - IND vs PAK: भारत-पाकिस्तान आशिया कप फायनलपूर्वी नवा वाद! PCB ने आता अर्शदीप सिंगविरुद्ध दाखल केली तक्रार

भारताचे प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

हेही वाचा IND vs PAK Final : या दोन दिग्गजांचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी; प्रशिक्षक गौतम गंभीरला टेन्शन!

पाकिस्तानचा प्लेइंग इलेव्हन

साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसेन तलत, मोहम्मद हरिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद. दरम्यान, भारत-पाकिस्तान सामना केवळ आशिया कपची अंतिम लढत नाही, तर दोन्ही देशांमधील चाहत्यांसाठी भावनांचा उत्सव ठरणार आहे. तथापी, आता हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत टीम इंडिया कशी कामगिरी करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या