Tuesday, November 11, 2025 09:57:08 PM

Women's T20 Trophy : महाराष्ट्राच्या मातीतल्या या महिला खेळाडूनं मोडला जागतिक विक्रम; टी-20 मध्ये 34 चेंडूत झळकावलं शतक

महारष्ट्राची सलामीवीर किरण नवगिरेने महिला टी-20 क्रिक्रेटमध्ये इतिहास रचला आहे. महिला टी-20 ट्रॉफीमध्ये पंजाबविरोधात खेळताना किरणने केवळ 34 चेंडूत शतक झळकावत सर्वात जलद शतकाचा जागतिक विक्रम मोडला.

womens t20 trophy  महाराष्ट्राच्या मातीतल्या या महिला खेळाडूनं मोडला जागतिक विक्रम टी-20 मध्ये 34 चेंडूत झळकावलं शतक

नागपूर: महारष्ट्राची सलामीवीर किरण नवगिरेने महिला टी-20 क्रिक्रेटमध्ये इतिहास रचला आहे. महिला टी-20 ट्रॉफीमध्ये पंजाबविरोधात खेळताना किरणने केवळ 34 चेंडूत शतक झळकावत सर्वात जलद शतकाचा जागतिक विक्रम मोडला. अखेर नवगिरेने 35 चेंडूत 106 धावा करत महाराष्ट्राला केवळ आठ षतके बाकी असताना विजय मिळवून दिला. 

या तूफानी खेळादरम्यान, किरण नवगिरेने 14 चौकार आणि 7 षतकार ठोकले. तिचा स्ट्राईक रेट तब्बल 302.86 इतका होता. महिला टी-20 क्रिक्रेटमध्ये 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटसह शतक करणारी ती एकमेव खेळाडू ठरली आहे. किरण नवगिरेने न्यूझिलंडच्या सोफी डेव्हिनचा 36 चेंडूत केलेल्या शकताचा विक्रम मोडला. महाराष्ट्राने 1 बाद 113 धावा करत हा सामना सहज जिंकला. 

सोलापूर जिल्ह्यातील मीरे गावातील किरण नवगिरेने आधी 2022 मध्ये नागालॅंडसाठी 76 चेंडूत 162 धावांची तुफानी खेळी करून चर्चेत आली होती. ती महिला टी-20 सामन्यात 150 पेक्षा जास्त धावा करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली होती. धोनीसारखी फलंदाजी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या किरण नवगिरेने आपल्या पराक्रमी फटक्यांमुळे भारताच्या टी-20 संघात स्थान मिळवले. सध्या ती महिला टी-20 क्रिक्रेट लीगमधील यूपी वॉरिअर्ज संघाकडून खेळत आहे. इतकंच नाही, तर तीन हंगामात तिने 419 धावा केल्या आहेत.

हेही वाचा: Asia Cup 2025: मोहसिन नकवीने 'या' ठिकाणी ठेवली आहे आशिया कप ट्रॉफी; समोर आली धक्कादायक माहिती

कोण आहे किरण नवगिरे?

किरण नवगिरेचा जन्म 18 सप्टेंबर 1994 रोजी सोलापूरमध्ये झाला. ती एक भारतीय महिला क्रिक्रेटपटू आहे, जी नागालॅंडच्या महिला टीमसाठी खेळते. 2022 मध्ये महिला सीनियर टी-20 ट्रॉफीदरम्यान, किरणने सर्वाधिक स्कोर करण्याचा विक्रम केला होता. त्यावेळी, किरण नागालॅंड महिला क्रिक्रेट संघाच्यावतीने अरुणाचल प्रदेशविरोधात खेळत होती. 


सम्बन्धित सामग्री