Saturday, April 26, 2025 12:02:30 AM

चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रलियाऐवजी वाजले भारतीय राष्ट्रगीत; जाणून घ्या घडलं काय?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या सामन्यादरम्यान दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी उभे असताना भारताचे राष्ट्रगीत लावण्यात आले.

चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रलियाऐवजी वाजले भारतीय राष्ट्रगीत जाणून घ्या घडलं काय

 
मुंबई: पाकिस्तानच्या लाहोरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सुरु होता. दोन्ही संघ दुखापतग्रस्त असून दोन्ही संघाच्या मुख्य खेळाडूंची अनुपस्थिती आहे. जसे भारत विरुद्ध पाकिस्तान तसंच नातं क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचं आहे. क्रिकेटमधील हे दोन सुरवात जुने संघ आहेत. 

प्रेक्षक आतूरतेने या सामन्याची वाट बघत होते. मैदानातील प्रेक्षक सामन्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभे राहिले. इंग्लंड संघाचे राष्ट्रगीत संपले आणि ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीतासाठी सर्व प्रेक्षक सज्ज झाले होते. तेवढ्यात ऑस्ट्रेलिया ऐवजी भारताचे राष्ट्रगीत वाजले. 'भारत भाग्य विधाता' हे ऐकतच आयोजकांना त्यांची चूक कळली आणि त्यांनी राष्ट्रगीत बंद केले. 

इंग्लंड संघाचे प्रथम फलंदाजी करत 351 धावांचा डोंगर ऑस्ट्रलियासमोर उभा केला आहे. इंग्लंडकडून सलामीवीर बेन डकेटने 165 धावा केल्या तर जो रूटने 68 धावा  केल्या. ऑस्ट्रेलियाकडून Ben Dwarshuisने 3 तर झाम्पा आणि लाबुशेनने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. ग्लेन मॅक्सवेलने 1 बळी घेतला. 

पाकिस्तानचा पुढचा सामना भारतासोबत आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. जर भारत हा सामना जिंकला तर भारत उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याकरिता ऐक पाऊल अजून जवळ येतील. पाकिस्तानला जर स्पर्धेत राहायचं असेल तर हा सामना जिंकणं महत्वाचं आहे. 


सम्बन्धित सामग्री