Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय नेमबाजांचा डंका; हिमांशू ढिल्लनने रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलने पटकावलं कांस्यपदक

पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात भारताच्या हिमांशू ढिल्लनने रौप्यपदकावर आपले नाव कोरले, तर रुद्रांक्ष पाटीलने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले.

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय नेमबाजांचा डंका; हिमांशू ढिल्लनने रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलने पटकावलं कांस्यपदक

Asian Games 2026: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय ॲथलीट्सची उत्कृष्ट आणि दमदार कामगिरी सातत्याने पाहायला मिळत आहे. सोमवारी पार पडलेल्या शूटिंगच्या थरारक लढतींमध्ये भारतीय नेमबाजांनी अप्रतिम अचूकता दाखवत देशाला दुहेरी आनंद मिळवून दिला. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात भारताच्या हिमांशू ढिल्लनने रौप्यपदकावर आपले नाव कोरले, तर रुद्रांक्ष पाटीलने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. अंतिम फेरीत हिमांशू ढिल्लनने 252.4 गुणांसह दुसरे स्थान मिळवत रौप्यपदक निश्चित केले. याच प्रकारात चीनच्या लिहाओ शेंगने 254.2 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत नवीन आशियाई विक्रम प्रस्थापित केला आणि सुवर्णपदक जिंकले. तर रुद्रांक्ष पाटीलने 230.9 गुणांची कमाई करत कांस्यपदकावर कब्जा केला.

पदक तालिकेत भारताची घोडदौड

या दोन महत्त्वाच्या विजयांसह आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील भारताची एकूण पदकसंख्या आता 6 वर पोहोचली आहे. यामध्ये 4 रौप्य आणि 2 कांस्यपदकांचा समावेश आहे. या कामगिरीच्या जोरावर भारत सध्या पदक तालिकेत 10 व्या स्थानावर विराजमान आहे. दुसरीकडे, यजमान आणि प्रतिस्पर्धी देशांमध्ये चीनने 23 पदकांसह (14 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य) अव्वल स्थान कायम ठेवले आहे. जपान 21 पदकांसह दुसऱ्या तर दक्षिण कोरिया 16 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

अंतिम फेरीतील थरारक चढाओढ

अंतिम फेरीची सुरुवात भारताच्या रुद्रांक्ष पाटीलने अत्यंत आक्रमक आणि अचूक केली होती. त्याने सुरुवातीच्या टप्प्यात चीनच्या अव्वल खेळाडूला कडवी टक्कर दिली. दुसऱ्या सिरीजअखेर रुद्रांक्ष 106.0 गुणांसह थेट आघाडीवर होता, तर लिहाओ 104.9 आणि हिमांशू ढिल्लन 104.8 गुणांवर होते. मात्र, मोक्याच्या क्षणी म्हणजेच सहाव्या फेरीत रुद्रांक्षला केवळ 9.7 गुण मिळवता आले, ज्याचा फायदा घेत हिमांशूने 10.6 गुणांची वेधक अचूकता साधली आणि दुसरे स्थान गाठत रौप्यपदक पक्के केले.

हेही वाचा – Vaibhav Sooryavanshi: 'वैभवकडे कसोटीत टिकण्याचे तंत्रच नाही…'; टी-20 स्टार वैभव सूर्यवंशीवर इंग्लंडच्या माजी खेळाडूची टीका, मायकल क्लार्कचा वेगळाच दावा

नेमबाजांची सुवर्णमय घोडदौड जारी

सोमवारचा दिवस भारतीय शूटिंगसाठी अतिशय यशस्वी ठरला. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताने रौप्यपदक जिंकल्यानंतर अवघ्या 1 तासाच्या आत हिमांशू आणि रुद्रांक्षने वैयक्तिक प्रकारातही पदके जिंकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी, महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात इलावेनिल वलारिवन, सोनम मस्कर आणि विदर्सा विनोद या त्रिकुटाने भारतासाठी रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर इलावेनिलने आपल्या वैयक्तिक प्रकारातही उत्कृष्ट प्रदर्शन करत रौप्यपदक जिंकले होते. भारतीय नेमबाजांच्या या यशामुळे क्रीडा जगतातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number