ICC Women’s T20 World Cup 2026: भारतीय संघाच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया ‘या’ 2 संघांशी भिडणार

6 जून ते 10 जून या कालावधीत हे सराव सामने पार पडतील, ज्यामुळे संघांना आपली तयारी अंतिम टप्प्यात नेण्याची संधी मिळेल.<br/>

ICC Women’s T20 World Cup 2026: भारतीय संघाच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया ‘या’ 2 संघांशी भिडणार

ICC Women's T20 World Cup 2026: आयसीसी (ICC) महिला T20 विश्वचषक 2026 च्या रणधुमाळीला आता काही दिवसच शिल्लक राहिले असून, या महाकुंभापूर्वी खेळल्या जाणाऱ्या सराव सामन्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये आयोजित होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी भारतीय महिला संघ दोन बलाढ्य संघांशी भिडणार आहे. 6 जून ते 10 जून या कालावधीत हे सराव सामने पार पडतील, ज्यामुळे संघांना आपली तयारी अंतिम टप्प्यात नेण्याची संधी मिळेल.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात होणार सामना
भारतीय महिला संघ या स्पर्धेची तयारी दोन महत्त्वाच्या सराव सामन्यांनी करणार आहे. वेळापत्रकानुसार, 8 जून रोजी 'टीम इंडिया'चा सामना वेस्ट इंडिजशी होईल, तर 10 जून रोजी भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध दोन हात करेल. हे दोन्ही सामने कार्डिफ येथील 'सोफिया गार्डन्स' मैदानावर खेळवले जातील. या सरावानंतर भारतीय संघ थेट विश्वचषक मोहिमेवर रवाना होईल, जिथे त्यांचा पहिला मुख्य सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

महिला क्रिकेटच्या इतिहासात तिकीट विक्रीचा नवा विक्रम
यावेळचा विश्वचषक केवळ खेळाच्या बाबतीतच नव्हे, तर लोकप्रियतेच्या बाबतीतही नवा इतिहास रचत आहे. स्पर्धा सुरू होण्यास 30 दिवस शिल्लक असतानाच 1,45,000 हून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. हा आकडा 2020 च्या विश्वचषकाच्या एकूण प्रेक्षकसंख्येपेक्षाही जास्त आहे. तिकीट विक्रीच्या बाबतीत हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी हंगाम ठरला असून, जगभरातील चाहत्यांमध्ये महिला क्रिकेटबद्दल असलेली प्रचंड उत्सुकता यातून अधोरेखित झाली आहे.

हेही वाचा- IPL 2026: CSK ला मोठा धक्का; दुखापतीमुळे 'हा' अष्टपैलू खेळाडू स्पर्धेबाहेर; पर्यायी खेळाडूची केली घोषणा

सराव सामन्यांचे ठिकाण आणि वेळ
हे सराव सामने कार्डिफमधील 'सोफिया गार्डन्स', डर्बी येथील 'काउंटी ग्राउंड' आणि 'लफबरो युनिव्हर्सिटी' अशा तीन महत्त्वाच्या ठिकाणी दोन सत्रात (सकाळी 10:00 आणि दुपारी 3:00 वाजता) खेळले जाणार आहेत. लफबरो युनिव्हर्सिटी येथे ईसीबीचे नॅशनल क्रिकेट परफॉर्मन्स सेंटर असल्याने तेथे सरावासाठी उत्तम सुविधा उपलब्ध असतील. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील उद्घाटनाच्या सामन्याने या मुख्य स्पर्धेची अधिकृत सुरुवात होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number