Thursday, November 13, 2025 09:06:21 AM

India vs South Africa: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा; ऋषभ पंत आणि आकाशदीप संघात परतले

या मालिकेसाठी तरुण फलंदाज शुभमन गिल याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर दीर्घ विश्रांतीनंतर परतणारा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत संघाचा उपकर्णधार असेल.

india vs south africa दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा ऋषभ पंत आणि आकाशदीप संघात परतले

India vs South Africa: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी तरुण फलंदाज शुभमन गिल याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर दीर्घ विश्रांतीनंतर परतणारा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत संघाचा उपकर्णधार असेल. इंग्लंड मालिकेनंतर दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेला पंत पुन्हा राष्ट्रीय संघात परतला आहे.

 तरुणाई आणि अनुभवाचा संगम

निवड समितीने अनुभवी खेळाडूंना आणि नव्या चेहऱ्यांना संधी देत संतुलित संघ जाहीर केला आहे. यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांसारख्या तरुण फलंदाजांना स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज जलदगती गोलंदाजी विभागाचं नेतृत्व करणार आहेत. फिरकी विभागात रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव हे प्रमुख खेळाडू असतील.

हेही वाचा - हार्दिक आणि माहिका यांच्यातली केमेस्ट्री.. दोघे मिळून कार धूत असल्याचा व्हिडिओ केला शेअर

ऋषभ पंतची पुन्हा एन्ट्री  

दक्षिण आफ्रिका A विरुद्ध झालेल्या अनधिकृत कसोटीत पंतने दुसऱ्या डावात 90 धावांची खेळी साकारत आपली फॉर्म सिद्ध केली होती. पायाच्या फ्रॅक्चरमुळे वेस्ट इंडिज मालिकेतून बाहेर राहिल्यानंतर त्याचे हे पुनरागमन भारतीय संघासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

मोहम्मद शमी पुन्हा संघाबाहेर

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यावेळीही संघाबाहेरच राहिला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही त्याचा विचार करण्यात आला नाही. दुसरीकडे, दुखापतीतून सावरलेला आकाश दीप पुन्हा संघात परतला आहे.

हेही वाचा - World Cup Trophy Tattoo: हरमनप्रीत कौरने हातावर काढला वर्ल्ड कप ट्रॉफीचा टॅटू; शेअर केली भावनिक पोस्ट

कसोटी सामन्यांचे वेळापत्रक

पहिला कसोटी सामना 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर तर दुसरा कसोटी सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान गुवाहाटी येथे खेळवला जाईल.

भारतीय कसोटी संघातील खेळाडू  

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.
 


सम्बन्धित सामग्री