South Africa vs India Women: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा; अनुष्का शर्माला प्रथमच संधी

या आगामी दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौर करणार असून, जूनमध्ये होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

South Africa vs India Women: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा; अनुष्का शर्माला प्रथमच संधी

South Africa vs India Women: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या आगामी दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौर करणार असून, जूनमध्ये होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते, त्यामुळे या दौऱ्यातही संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

संघात मोठे बदल: अनुष्का शर्माचे पदार्पण
या निवडीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे युवा खेळाडू अनुष्का शर्मा हिला मिळालेली पहिली संधी. अनुष्कासोबतच उमा छेत्री आणि काशवी गौतम यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, निवड समितीने काही कठोर निर्णय घेत वैष्णवी शर्मा, स्नेह राणा, जी. कमलिनि आणि अमनजोत कौर यांना संघातून वगळले आहे. जी. कमलिनिच्या जागी उमा छेत्रीचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने टी-20 मालिका 2-1 ने जिंकली होती, तीच लय दक्षिण आफ्रिकेतही कायम राखण्याचा प्रयत्न 'टीम इंडिया' करेल.

गोलंदाजी फळीत काशवी गौतमची एन्ट्री
दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्या लक्षात घेता भारताने आपली वेगवान गोलंदाजी अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. अमनजोत कौरच्या जागी काशवी गौतमला संघात स्थान दिले आहे, जिने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. फिरकी गोलंदाजीची मदार अनुभवी दीप्ती शर्मा, श्रेयस चारानी आणि श्रेयंका पाटील यांच्यावर असेल. विश्वचषकासाठी अंतिम संघ निवडण्यापूर्वी आपली दावेदारी सिद्ध करण्याची ही या खेळाडूंसाठी सुवर्णसंधी आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही मालिका 17 एप्रिलपासून सुरू होत आहे. 

IND-W vs SA-W: T20 मालिकेचे वेळापत्रक 
T20 मालिकेतील पहिला सामना 17 एप्रिल रोजी डर्बन येथे खेळला जाणार आहे. दुसरा सामना 19 एप्रिल रोजी त्याच मैदानावर होईल. तिसऱ्या आणि चौथ्या T20 सामन्यांसाठी भारतीय महिला संघ जोहान्सबर्गला प्रवास करेल. तिसरा T20 सामना 22 एप्रिल रोजी आणि चौथा T20 सामना 25 एप्रिल रोजी खेळला जाईल. दरम्यान, मालिकेतील अंतिम सामना 27 एप्रिल रोजी बेनोनी येथे पार पडेल.

हेही वाचा – ICC Player of the Month: ICC कडून 'प्लेअर ऑफ द मंथ'ची घोषणा; भारताच्या 'या' महिला खेळाडूला मिळाला ऐतिहासिक बहुमान

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टिरक्षक), अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, काशवी गौतम, भारती फुलमाळी, उमा छेत्री (यष्टिरक्षक), अनुष्का शर्मा. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number