IND vs NZ Final: भारताचा धावांचा डोंगर! संजू, इशान आणि अभिषेकच्या वादळापुढे न्यूझीलंड हतबल; विजयासाठी ‘इतक्या’ धावांचे आव्हान

संजू सॅमसन, इशान किशन आणि अभिषेक शर्मा यांच्या स्फोटक अर्धशतकांमुळे भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी मोठ्या धावांचे कठीण लक्ष्य ठेवले आहे.<br/>

IND vs NZ Final: भारताचा धावांचा डोंगर! संजू, इशान आणि अभिषेकच्या वादळापुढे न्यूझीलंड हतबल; विजयासाठी ‘इतक्या’ धावांचे आव्हान

IND vs NZ Final: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 255 धावांचा विशाल धावसंख्या उभारली आहे. संजू सॅमसन, इशान किशन आणि अभिषेक शर्मा यांच्या स्फोटक अर्धशतकांमुळे भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 256 धावांचे कठीण लक्ष्य ठेवले आहे.

संजू सॅमसनचे वादळी 89; इशान-अभिषेकची साथ
भारताची सुरुवात धडाकेबाज झाली. सलामीवीर अभिषेक शर्माने 52 धावा कुटून पाया रचला. त्यानंतर संजू सॅमसनने आपल्या फॉर्मचे दर्शन घडवत केवळ 46 चेंडूत 89 धावांची सर्वोच्च खेळी साकारली. यामध्ये त्याने रचिन रवींद्रच्या एकाच षटकात तीन सलग षटकार खेचले. दुसऱ्या बाजूने इशान किशनने अवघ्या 23 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत 54 धावांचे योगदान दिले. या त्रिकुटाच्या फटकेबाजीमुळे भारताने 15 व्या षटकातच 200 धावांचा टप्पा ओलांडला होता.

जेम्स नीशमचे दोन धक्के आणि भारताची मधली फळी
सामन्याच्या 16 व्या षटकात जेम्स नीशमने भारताला दोन मोठे धक्के दिले. त्याने आधी अर्धशतकवीर इशान किशनला आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर कर्णधार सूर्यकुमार यादवला (0) बाद केले. 19 व्या षटकात हार्दिक पंड्या 18 धावा करून बाद झाला, तेव्हा भारताची धावसंख्या 5 बाद 226 अशी होती. मात्र, शेवटच्या षटकांमध्ये शिवम दुबेने केवळ 8 चेंडूत नाबाद 26 धावांची फटकेबाजी करून भारताला 255 पर्यंत मजल मारून दिली.

हेही वाचा – Prithvi Shaw Engagement: मैदानाबाहेर पृथ्वी शॉ 'क्लीन बोल्ड'! प्रेयसी आकृती अग्रवालसोबत थाटात उरकला साखरपुडा, पाहा खास फोटोज

न्यूझीलंडसमोर पहाडाएवढे लक्ष्य
न्यूझीलंडकडून जेम्स नीशमने सर्वाधिक बळी घेतले, तर मॅट हेन्री आणि रचिन रवींद्र यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला. अंतिम सामन्याचा दबाव आणि 256 धावांचे अवाढव्य लक्ष्य पाहता न्यूझीलंडच्या फलंदाजांची मोठी कसोटी लागणार आहे. अहमदाबादच्या खेळपट्टीवर भारताचे गोलंदाज आता हा विजय खेचून आणण्यासाठी मैदानात उतरतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number