आशियाई स्पर्धा 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची मांदियाळी लावली आहे. नेमबाजी, शर्यत, कुस्ती व आपला राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीमध्ये भारतीय खेळाडूंनी दणदणीत विजय मिळवत भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकसंख्या वाढवली आहे.
आता प्रत्येक वेळेस गाजणारा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. मग वन डे, टेस्ट, 20 ओव्हरची मॅच असो, प्रत्येक सामना हा पाहण्यासारखा असतोच. अशातच आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात 19 धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने सुवर्ण पदक पटकावले आहे. भारताने टॉस जिंकत सर्वप्रथम फलंदाजी निवडली. यात भारतीय संघाने 211 धावांची खेळी केली. यात अभिषेक शर्मा व तिलक वर्मा यांनी अर्धशतक करत मोठी खेळी केली. परंतु पुढे 6 गडी गमावले.
मात्र पाकिस्तानचे फलंदाज हे भारताच्या गोलंदाजांसमोर टिकले नाहीत. भारतीय गोलंदाजांना पाकिस्तान संघाला 211 धावांच्या लक्ष्यापर्यंत रोखण्यात यश आले. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर व शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले आणि 20 ओव्हरचा हा सामना 192 धावांवर संपला. असा दणदणीत विजय मिळवून भारतीय संघाने अभिमानाचा आणखीन एक तुरा भारतीय शिरपेचात खोवला आहे.