Sunday, April 20, 2025 05:53:28 AM

IPL संघ कोण विकत घेऊ शकतो? एक संघ खरेदीसाठी किती पैसे लागतात

जगभरात IPL ची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहेत. सद्या आयपीएलमध्ये दहा संघ खेळतात. आयपीएल मधील संघ कोण खरेदी करू शकतो आणि त्याची किंमत किती असते?

ipl संघ कोण विकत घेऊ शकतो एक संघ खरेदीसाठी किती पैसे लागतात
IPL संघ कोण विकत घेऊ शकतो? एक संघ खरेदीसाठी किती पैसे लागतात

मुंबई : इंडियन प्रिमियर लीग ही जगातील सर्वात मोठी लीग आहे. यंदा IPL चा हा 18 वा हंगाम असून या हंगामाला 22 मार्चपासून सुरूवात होणार आहे. IPL फक्त क्रिकेट नाही तर तो एक मोठा बिझनेस आहे. जगभरातील मोठमोठ्या उद्योगपती आणि कंपन्या यात गुंतवणूक करतात. IPL च्या प्रत्येक संघाची किंमत हजारो कोटी रुपयांमध्ये असते. त्यामुळे ही टीम कोण विकत घेऊ शकतं. त्यासाठी किती गुंतवणूक लागते आणि कोणत्या अटी असतात. याविषयी या लेखात जाणून घेऊया.

IPL मध्ये 10 संघ खेळतात आणि प्रत्येक संघाचे मालक वेगळे असतात. नवीन संघ समाविष्ट करताना किंवा विद्यमान संघाचे मालक बदलल्यास BCCI लिलावाचं आयोजन करतं. हा लिलाव बहुतेक मुंबई किंवा दिल्लीमध्ये आयोजित केलं जातं. यात जगभरातील मोठ्या कंपन्या आणि गुंतवणूकदार संघ विकत घेण्यासाठी बोली लावतात.

हेही वाचा -  टीम नाही, वादळ आहे! IPL 2025 मध्ये अशी आहे SRH ची भेदक प्लेइंग 11

संघ खरेदीसाठी BCCI ची परवानगी आवश्यक
IPL चा संघ खरेदी करायचा असल्यास BCCI कडून रितसर परवानगी घ्यावी लागते. इच्छुक गुंतवणूकदारांनी स्वतःची आर्थिक स्थिती आणि व्यवस्थापन क्षमता सिद्ध करावी लागते. संघ चालवण्यासाठी भांडवल आहे का व्यवस्थापनासाठी सक्षम टीम आहे का याची संपूर्ण तपासणी केली जाते.

IPL टीमसाठी किती पैशांची आवश्यकता?
IPL मध्ये संघ खरेदी करणे म्हणजे करोडोंच्या गुंतवणुकीचा खेळ आहे. नवीन संघ खरेदी करण्यासाठी किमान 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते. जर तुम्हाला मुंबई इंडियन्स किंवा चेन्नई सुपर किंग्ज सारखे यशस्वी संघ विकत घ्यायचे असल्यास 5000 ते 6000 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मोजावी लागते. 

हेही वाचा - IPL इतिहासातील बेस्ट ११ खेळाडू, गिलख्रिस्टच्या संघात कोणाला स्थान ?

एकदा संघ खरेदी केल्यानंतर तो चालवण्यासाठीही प्रचंड खर्च असतो. खेळाडूंच्या बोलीपासून स्टाफच्या पगारापर्यंत, मार्केटिंगपासून स्टेडियम व्यवस्थापनापर्यंत दरवर्षी शेकडो कोटींची गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे IPL संघ चालवणे हे फक्त मोठ्या उद्योगपती आणि जागतिक कंपन्यांसाठीच परवडणारे आहे.

यंदाच्या IPL 2025 हंगामातही 10 संघ मैदानात उतरणार आहेत, त्यात मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश आहे.
 


सम्बन्धित सामग्री