आयपीएल 2026 चा यंदाचा सीझन निर्णायक टप्प्यात आला आहे. अशातच 24 मे रोजी साखळी फेरीतील शेवटचा सामना असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने केकेआरला नमवत विजयासह सहाव्या स्थानावर पूर्णविराम मिळवला आहे. या सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक केकेआरच्या बाजूने लागल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी करण्याचा मान मिळाला. दिल्ली कॅपिटल्सने 5 गडी गमवून केकेआर समोर 204 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान पुर्ण करत केकेआर संघ 163 धावांवर गारद झाला, ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने 40 धावांसह या सामन्यात बाजी मारली.
यावेळी प्रथम फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सकडून अभिषेक पोरेल याने 22 धावांची खेळी केली. याशिवाय साहिल परेख 24 धावांवर आपल्या ताफ्यात परतला. यानंतर मात्र केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनी आश्वासक सुरूवात केली. केएल राहुलने 30 बॉलमध्ये 60 धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने 25 बॉलमध्ये 39 धावांचा जोर दाखवला. डेविड मिलरने देखील 19 बॉलमध्ये 28 धावा केल्या. तसेच आशुतोश शर्माने 11 बॉलमध्ये नाबाद 18 धावांची खेळी केली. तर गोलंदाजांमध्ये लुंगिसानी न्गिडीने आणि कुलदीप यादवने केकेआरचे प्रत्येकी 3-3 गडी बाद केले. तसेच मिचेल स्टार्कने 2 विकेट घेतल्या. अशाप्रकारे दिल्ली कॅपिटल्सने केकेआरसमोर 204 धावांचा डोंगर उभा केला.
दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने 39 बॉलमध्ये 63 धावांची खेळी केली. मात्र यावेळी केकेआरचा एकही खेळाडू 30च्या पुढे मैदानावर टिकला नाही. केकेआरकडून सौरभ दुबेने 2 बळी घेतले. ज्यामुळे केकेआर संघ 163 धावांवर पुर्णबाद झाला. यासह लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने केकेआरला 40 धावांनी धूळ चारली. यावेळी या हंगामात केकेआरची सुरुवात आणि शेवट दोन्ही पराभवानेच झाला.