Monday, June 15, 2026 12:43:15 AM

IPL 2026 RCB vs SRH : भुवनेश्वर कुमारच्या ओव्हरमध्ये कोहलीची 'ती' चूक अन् संपूर्ण स्टेडियम झाला हक्काबक्का

आयपीएल 2026 19 व्या हंगामाची धमाकेदार सुरुवात 28 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या सामन्याने झाली.या सामन्यादरम्यान विराट कोहलीकडून मोठी चूक झाली.

ipl 2026 rcb vs srh   भुवनेश्वर कुमारच्या ओव्हरमध्ये कोहलीची ती चूक अन् संपूर्ण स्टेडियम झाला हक्काबक्का

Virat Kohli drops easy catch : आयपीएल 2026 19 व्या हंगामाची धमाकेदार सुरुवात 28 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या सामन्याने झाली. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या हायव्होल्टेज सामन्यात 200 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करत RCB ने आपल्या हंगामाची सुरुवात विजयानं केली. कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दमदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. आयपीएल 2026 स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 200 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करणारा संघ म्हणून त्यांनी आपलं नाव नोंदवलं. यादरम्यान हैदराबाद संघाच्या फलंदाजीवेळेस विराट कोहलीकडून मोठी चूक झाली. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने एक सोपा झेल सोडला, ज्यामुळे अनिकेत वर्माला जीवदान मिळाले.

हेही वाचा- RCB vs SRH: कोहली-पडीक्कलच्या जबरदस्त खेळीने उडवला हैदराबादचा धुव्वा; 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करत मिळवला दणदणीत विजय
कोहलीची ती चूक अन् सामना हातातून जाता जाता वाचला
भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या 18 व्या षटकात विराट कोहलीकडून एक चूक झाली. 18व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अनिकेतने दोन धावा घेतल्या. या षटकाच्या सुरुवातीला त्यांची धावसंख्या 167धावांवर सात गडी बाद अशी होती. अनिकेत वर्मा 10 चेंडूंमध्ये 20 धावा करून, तर हर्ष दुबे तीन चेंडूंमध्ये तीन धावा करून खेळपट्टीवर होता. भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या तिसरा चेंडूवर अनिकेतने फटका मारला, मात्र हा फटका अपेक्षेप्रमाणे लांब गेला नाही. लाँग-ऑनवरून पुढे धावलेल्या कोहलीने तो झेलण्याचा प्रयत्न केला, पण तो अविश्वसनीयरीत्या त्याच्या हातातून निसटला. जेव्हा चेंडू आपल्या हातातून निसटला आहे हे लक्षात आले, तेव्हा  चिन्नास्वामी स्टेडियममधील आरसीबीचे चाहतेही चकित झाले होते, तर स्टेडियममध्ये बसलेल्या अनुष्का शर्माला तो क्षण पाहून हसू आवरता आले नाही. कोहलीसह सर्वजण धक्का बसलेल्या अवस्थेत असताना, अनुष्काची ही मजेशीर प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

हेही वाचा- RCB vs SRH IPL 2026: इशान किशन आणि अनिकेत वर्माची तुफान फटकेबाजी; RCB समोर 202 धावांचं लक्ष्य
सुरुवातीच्या धक्क्यांनंतर इशान किशनचे वादळ
हैदराबादची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. अवघ्या 29 धावांवर त्यांचे अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड आणि नितीश कुमार रेड्डी हे 3 प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते. मात्र, त्यानंतर कर्णधार इशान किशन याने डावाची सूत्रे हाती घेतली. इशानने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 38 चेंडूंमध्ये 80 धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 5 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. डावाच्या अखेरीस अनिकेत वर्माने केवळ 18 चेंडूंमध्ये 43 धावा कुटल्या, ज्यामुळे हैदराबादला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. एकवेळ हैदराबाद मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असताना आरसीबीच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत सामन्यावर पकड मिळवली.


सम्बन्धित सामग्री