Rohit Sharma: वानखेडेवर ‘हिटमॅन’चा धमाका; रोहित शर्माने इतिहास रचला, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज

रोहित शर्माने 84 धावांची तुफानी खेळी करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीने संघाच्या प्लेऑफ आशांना बळ मिळाले.

Rohit Sharma: वानखेडेवर ‘हिटमॅन’चा धमाका; रोहित शर्माने इतिहास रचला, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज

मुंबई: “फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट,” या उक्तीची प्रचिती आज वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा आली. सोमवारी पार पडलेल्या आयपीएल 2026 च्या 47 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने त्याच्या तुफानी फलंदाजीने इतिहासाच्या पानात सुवर्णक्षरांनी नाव कोरले आहे.

बऱ्याच काळानंतर मैदानात परतलेल्या ‘हिटमॅन’ने लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. रोहितने अवघ्या 44 चेंडूंत 84 धावांची आतिशी खेळी साकारली, ज्यामध्ये 7 गगनचुंबी षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. या खेळीने त्याने केवळ संघाला विजय मिळवून दिला नाही, तर एक अद्वितीय विक्रमही त्याच्या नावे केला.

रोहित शर्माने या सामन्यात षटकारांचा पाऊस पाडत आयपीएलच्या इतिहासात लक्ष्य गाठताना150 षटकार पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या नावे आता धावांचा पाठलाग करताना 153 षटकार जमा झाले आहेत. या यादीत तो आता केवळ वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल (156 षटकार) याच्या मागे आहे. रोहितने या कामगिरीसह विराट कोहली (138) आणि संजू सॅमसन (117) यांसारख्या मोठ्या खेळाडूंना मागे टाकले असून, लवकरच तो ख्रिस गेलचा जागतिक विक्रम मोडीत काढण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा: Rahul Gandhi: ‘आम्ही ममता बॅनर्जी यांच्यासोबत सहमत…’, ममता बॅनर्जींच्या निवडणूक चोरीच्या आरोपावर राहुल गांधी यांची पोस्ट

मुंबई इंडियन्सने 229 धावांच्या अवाढव्य लक्षाचा पाठलाग करताना रयान रिकेल्टन आणि रोहित शर्मा यांच्यातील 143 धावांच्या विक्रमी सलामीच्या भागीदारीच्या जोरावर 18.4 षटकांतच विजय साकारला. रयान रिकेल्टनने 83 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्यामुळे मुंबईला एक भक्कम सुरुवात मिळाली. रोहितने केवळ आक्रमक पवित्राच घेतला नाही, तर तिलक वर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी 34 धावांची मोलाची भागीदारी करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयाने मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या धूसर आशांना नवीन संजीवनी दिली आहे.

या धडाकेबाज विजयानंतर मुंबई इंडियन्स 10 सामन्यांत 3 विजयांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचली आहे. दुसरीकडे, या पराभवामुळे लखनऊ सुपर जायंट्सचा संघ शेवटच्या पायदानावर फेकला गेला आहे. रोहितची ही खेळी त्याच्या तंदुरुस्तीवर आणि फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांसाठी एक चोख उत्तर ठरली आहे. जेव्हा संघाला सर्वात जास्त गरज होती, तेव्हा रोहितने ‘मॅच विनर’ म्हणून त्याची भूमिका चोख बजावून आपण अजूनही ‘हिटमॅन’ का आहोत, हे सिद्ध करून दिले. क्रीडाप्रेमींकडून रोहितच्या या ‘विंटेज’ खेळीचे प्रचंड कौतुक होत असून, मुंबईच्या आगामी सामन्यांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा: TVK: थलपती विजयच्या पक्षाच्या नावातच दडलाय मोठा राजकीय संदेश; अर्थ वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number