IND vs IRE 2nd T20 : अय्यरच्या नेतृत्वावर पहिल्याच मालिकेत पराभवाचा शिक्का! दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाची सर्वात मोठी हाराकिरी

आतापर्यंतच्या टी20 मालिकेत टीम इंडिया आयर्लंडकडून एकही सामना हरली नव्हती मात्र सध्या सुरु असलेल्या दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला दुबळ्या आयर्लंडकडून पराभव पचवावा लागला आहे.

IND vs IRE 2nd T20 : अय्यरच्या नेतृत्वावर पहिल्याच मालिकेत पराभवाचा शिक्का! दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाची सर्वात मोठी हाराकिरी

आतापर्यंतच्या टी20 मालिकेत टीम इंडिया आयर्लंडकडून एकही सामना हरली नव्हती मात्र सध्या सुरु असलेल्या दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला दुबळ्या आयर्लंडकडून पराभव पचवावा लागला आहे. टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाला आयर्लंडसारख्या नवख्या संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात अवघ्या 1 धावेने पराभूत केले. एवढचं नव्हे तर 2-0 ने व्हाईटवॉश दिला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियावर आयर्लंडचा हा पहिलाच मालिका विजय आहे. त्यामुळे अय्यरच्या नेतृत्वावर पहिल्याच मालिकेत पराभवाचा शिक्का बसला आहे. 

हेही वाचा- गौतम गंभीर यांची होणार हकालपट्टी? 'हा' माजी स्टार क्रिकेटपटू बनू शकतो टीम इंडियाचा हेड कोच; श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदावर मोठी भविष्यवाणी

सुरुवातीला दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला. यावेळी श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे प्रथम फलंदाजी करण्याचा मान आयर्लंडला मिळाला. प्रथम फलंदाजी करत आयर्लंडने टीम इंडियासमोर 155 धावांचा डोंगर उभा केला. हे आव्हान गाठताना टीम इंडिया 153 धावांवर पुर्णबाद झाला. ज्यामुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वात मोठा आणि लाजिरवाणा धक्का आज क्रिकेट चाहत्यांना बसला आहे. 

आयर्लंडने दिलेल्या 155 धावांचा पाठलाग करत टीम इंडियाकडून सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेले संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद झाले. ज्यामुळे सुरूवात निराशाजनक झाली. त्यानंतर हार्षित राणा 21, ईशान किशन 12, कर्णधार श्रेयस अय्यर 10, अक्षर पटेल 14, शिवम दुबे 20, सूर्यांश शेडगे 1 धावा करून बाद झाले. यावेळी तिलक वर्माने 46 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार मारत 55 धावा केल्या ज्यामुळे कुठे तरी आशेचा किरण उगवताना पाहायला मिळत होता. मात्र शेवटच्या शटकात पुन्हा टीम इंडियातील खेळी ढासाळताना पाहायला मिळाली. यासह आयर्लंडने इतिहास रचत पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताला पराभूत केले. या विजयासह आयर्लंडने केवळ सामना जिंकला नाही, तर टीम इंडियाविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजयही नोंदवला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number