Jasprit Bumrah Viral Video : एका छोट्याशा कारणावरून बुमराह चाहत्यावर संतापला आणि फोन फेकला; एअरपोर्टवरील Viral Video

टीम इंडियातील वेगवान गोलंदाज जस्प्रीत बुमराह त्याच्या एका कृतीमुळे चाहत्यांच्या नजरेत आला आहे. एअरपोर्टवर असताना जसप्रीत बुमराहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Jasprit Bumrah Viral Video : एका छोट्याशा कारणावरून बुमराह चाहत्यावर संतापला आणि फोन फेकला; एअरपोर्टवरील Viral Video

सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील चौथा टी-20 सामना बुधवारी 17 डिसेंबर रोजी लखनऊमधील एकाना स्टेडियमवर खेळवला जाणार होता. मात्र धुक्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील निकालाच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा होता. यानंतर टीम इंडियातील यॉर्कर्स किंग आणि वेगवान गोलंदाज जस्प्रीत बुमराह त्याच्या एका कृतीमुळे चाहत्यांच्या नजरेत आला आहे. एअरपोर्टवर असताना जसप्रीत बुमराहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा- U19 Asia Cup 2025 : U-19 आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानशी सामना होणार?; सेमीफायनल्समध्ये ‘या’ चार संघांमध्ये लढत

या व्हिडीओमध्ये बुमराहाचा राग अनावर झालेला असून त्याने त्याच्या बाजूला असलेल्या एका चाहत्याचा फोन हिसकावून घेतल्याचे दिसून आले. एअरपोर्टवर बुमराहसोबत एक चाहता देखील रांगेत उभा होता. ज्यावेळेस त्याने स्वतःच्या बाजूला बुमराहला उभा असलेले पाहिले त्यावेळेस त्याने कोणतीही परवानगी न घेता बुमराहसोबत सेल्फी व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला बुमराहने त्याला शांतपणे तो जे करत होता ते न करण्याच्या सूचना दिल्या. वॉर्निंग देऊन देखील चाहत्याने व्हिडिओ बनवायच थांबवलं नाही. दिलेल्या वॉर्निंगकडे दुर्लक्षित केल्याने बुमराह संतापला आणि त्याने रागाच्या भरात चाहत्याकडून फोन हिसकावून घेतला आणि फेकून दिला.

हेही वाचा- IPL Auction 2026: आयपीएल ऑक्शनमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान; नेमकं प्रकरण काय?

या घटनेदरम्यान बुमराह आणि चाहत्यामध्ये थोडक्यात बातचीत काय झाली? जाणून घ्या… 

चाहता म्हणाला- सर, मी आता तुमच्यासोबतच जाईन? 
यावर बुमराह म्हणाला- तुझा फोन पडला, तर मला बोलू नकोस. 
त्यावर चाहता म्हणाला- काही हरकत नाही सर.
पुढे बुमराहने बरं ठीक आहे म्हणत चाहत्याचा फोन हिसकावून घेतला आणि फेकून दिला. हा सगळा प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून सध्या तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number