मुंबई: भारतीय संघाने कट्टकमधला सामना जिंकून मालिका खिश्यात टाकली आहे. भारतीय संघाची कामगिरी टी 20 मालिकेत उत्तम होती. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतदेखील केली. जवळपास सर्व भारतीय खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केलं.
भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष टिकून असतं. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफी असल्याने भारतीय खेळाडूंची कामगिरी सूक्ष्म नजरेने बघितली जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जे खेळाडू फॉर्म मध्ये दिसत नव्हते त्यातले अधिताकतर खेळाडू फॉर्म मध्ये आले आहेत. रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही त्यातील मुख्य नावे. संघात पुनरागमन करत असणाऱ्या श्रेयस अय्यरनेदेखील उत्तम प्रदर्शन केले आहे. मात्र, विराट कोहली आणि शमीकडून चांगल्या प्रदर्शनाची असलेली अपॆक्षा अजून तरी पूर्ण होताना दिसली नाही.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. त्यांनतर विराटचा धावांचा दुष्काळ चालूच आहे. विराट कोहलीचं चांगलं खेळणं भारतीय संघासाठी महत्वाचं आहे. कारण हे जग जाहीर आहे की विराट जेव्हा खेळतो तो स्वतःचा बळावर सामना भारताला जिंकावतो. विराट कोहली 'फॉर्म'मध्ये आला तर भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायच्या शक्यता दुपटी वाढवणार. विराट कोहलीचं शेवटचं एकदिवसीय शतक 2023 मधल्या विश्वचषकात आलं होत.
शमीच्या पुनरागमनानंतर त्याचा गोलंदाजीतला प्रभाव कमी झालेला दिसत आहे. शमीच्या गोलंदाजीच्या वेगात फारसा फरक नाही पडला. मात्र फलंदाज त्याला सहजतने खेळताना दिसले आहेत. त्याचा गोलंदाजीवर आक्रमण कारण हे फलंदाजांची सोपं झालेलं दिसलं. त्याची इकॉनॉमीदेखील जास्त राहिली आहे.
शमी आणि विराट सोबत अजून एक खेळाडू खराब 'फॉर्म'मुळे त्रस्त आहे आणि तो म्हणजे के एल राहुल. केएल राहुलने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरवात चांगली केली होती. मात्र मालिकेच्या शेवट पर्यंत ती लय केएल राहुलच्या फलंदाजीत राहिली नाही. कट्टकच्या सामन्यात यष्टिरक्षण करतानादेखील राहुल संघर्ष करत होता. त्याच्या जागी तिसऱ्या सामन्यात रिषभ पंतला संधी मिळण्याच्या शकत दिसत आहेत.