आयपीएलच्या 19 व्या हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात होणार असून त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे ललित मोदी यांनी आयपीएल 2026 सुरु होण्यापूर्वी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. त्यांच्या एका ट्वीटमधून आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामातील ऐतिहासिक लिलाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ललित मोदी यांनी 2008 मधील ऐतिहासिक आयपीएल लिलावासंदर्भात ट्वीट केले आहे. ज्यात त्यांनी 2008 च्या आयपीएल लिलावाची आकडेवारी शेअर केली आहे.
हेही वाचा- IPL 2026 : ‘या’ 3 संघांची 18 वर्षांपासूनची चॅम्पियन होण्याची प्रतिक्षा संपणार? आरसीबीनंतर कोणाचा नंबर?
ललित मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, “यासाठीच्या मूळ बोली आहेत @IPL 24 जानेवारी 2008 रोजी मुंबईतील क्रिकेट सेंटरमध्ये दुपारी 12:00 वाजता बोली लावण्यात आल्या. त्या दिवशी बोलींचे रुपयांमध्ये रूपांतर करण्यात आले. त्या सकाळी एक डॉलर म्हणजे 40 रुपये होते. त्यामुळे आजच्या काळात झालेल्या खऱ्या मूल्यवृद्धीचा अंदाज लावता येतो. शिवाय, बोलीची रक्कम 10 वर्षांमध्ये समान हप्त्यांमध्ये दिली जाणार होती. अनेक संघ पहिल्या वर्षानंतरच नफ्यात होते. त्यामुळे ही रक्कम त्यांच्या रोख प्रवाहातून आली. म्हणून, माध्यमांना वाटते त्यापेक्षा मूल्यवृद्धी खूपच जास्त आहे. संघ खरेदी करण्यासाठी प्रत्येक संघाने खर्च केलेले नेमके आकडे फक्त कंपनी रजिस्ट्रारकडे दाखल केलेल्या कंपनीच्या कागदपत्रांमध्येच दिसतील. त्यामुळे अचूकतेसाठी आणि खऱ्या मूल्यवृद्धीसाठी ते तपासा.”
त्यांनी केलेल्या या ट्वीटमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, आज अब्जावधी रुपयांचे असलेले संघ एकेकाळी खूप कमी किमतीत खरेदी केले गेले होते. आपल्या ट्वीटमध्ये ललित मोदींनी विशेषतः यावर जोर दिला की, तेव्हा 1 डॉलरचे मूल्य अंदाजे 40 रुपये होते. याचा अर्थ असा की, जी रक्कम तेव्हा मोठी वाटत होती, ती आजच्या काळात खूपच लहान आहे. आजच्या मूल्याच्या तुलनेत, या संघांचे मूल्य अनेक पटींनी वाढले आहे. यामुळेच आयपीएलला आता जगातील सर्वात यशस्वी क्रीडा लीगपैकी एक मानले जाते.
हेही वाचा- IPL 2026: यंदा आयपीएलचा ‘ग्लॅमरस’ उद्घाटन सोहळा नसणार? ‘हे’ कारण आलं समोर
कोण आहेत ललित मोदी?
ललित मोदी एक भारतीय व्यवसायी आणि क्रिकेट प्रशासक आहेत, जे प्रामुख्याने 2008-2010 मधील इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष म्हणून ओळखले जातात. त्यांनी क्रिकेटमध्ये ग्लॅमर आणि व्यवसायाची सांगड घालून आयपीएलला जागतिक स्तरावर लोकप्रिय केले. आयपीएलला मोठे यश मिळवून देण्याचे श्रेय त्यांना जाते, परंतु 2010 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर त्यांना बीसीसीआयमधून निलंबित करण्यात आले आणि ते लंडनला स्थायिक झाले.
This is original bids for @IPL that were awarded on 24th January 2008 in mumbai at cricket center at 12:00 pm. The bids were converted into rupees on that day. One dollar was 40 rupees on that morning. So one can just judge the true value appreciation today. ?? further the amount… pic.twitter.com/CTQ9YkyyFw — Lalit Kumar Modi (@LalitKModi) March 26, 2026