Naseem Shah Viral Video: ‘चहा प्यायला चला…’; पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शहाचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल

आशिया कपदरम्यान दोन्ही संघांनी एकमेकांना हस्तांदोलनही न करता सामना खेळला होता. अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शहा याचा मराठीत संवाद साधतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.<br/>

Naseem Shah Viral Video: ‘चहा प्यायला चला…’; पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शहाचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल

Naseem Shah Viral Video: गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तानमधील राजकीय आणि क्रीडाक्षेत्रातील तणाव कोणापासूनचं लपून राहिलेला नाही. अशातचं आता पाकिस्तानच्या एका तरुण क्रिकेटपटूचा व्हिडिओ मात्र चाहत्यांना आनंद देणारा ठरतोय. आशिया कपदरम्यान दोन्ही संघांनी एकमेकांना हस्तांदोलनही न करता सामना खेळला होता. अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शहा याचा मराठीत संवाद साधतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – IPL 2026 Auction : आयपीएल 2026 च्या लिलावासाठी 350 खेळाडूंची अंतिम यादी तयार; भारताच्या ‘इतक्या’ खेळाडूंचा यादीत समावेश

दरम्यान, ILT20 लीगमध्ये खेळत असलेल्या नसीमला तिथे एक मराठी सहकारी भेटला. त्याच्याकडून काही मराठी वाक्ये शिकताच नसीमने त्याची लगेच उजळणीही केली. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये तो सहकाऱ्याला म्हणतो, “चहा प्यायला चला”, आणि दोघेही त्यानंतर चहासाठी जातात. तिथे पोहोचल्यावरही नसीम मराठीतच म्हणतो, “आता मला बरं वाटतंय.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  

हेही वाचा – India Vs South Africa : तिन्ही फॉर्मेटमध्ये विकेट्सचं शतक करणारा पहिला भारतीय गोलंदाज, ‘या’ पठ्ठ्याने रचला नवा रेकॉर्ड

आंतरराष्ट्रीय लीगमध्ये विविध देशांतील खेळाडू एकत्र येतात. अशा वेळी सांस्कृतिक देवाणघेवाण होतेच, असं नसीमने सांगितलं. “आम्ही एक महिना एकत्र राहतो, खेळतो. त्यामुळे त्यांच्या कडून काहीतरी शिकायला मिळतंच, आणि ते आमच्याकडून काही गोष्टी शिकतात,” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number