Lionel Messi चं भारतात जंगी स्वागत; मुंबईतही येणार फुटबॉल आयकॉन

Lionel Messi याच्या भारत दौऱ्याच्या बातमीने पुण्यासह देशभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

Lionel Messi चं भारतात जंगी स्वागत; मुंबईतही येणार फुटबॉल आयकॉन

कोलकाता: जगभरातील फुटबॉलप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर भारतात साकार झाला आहे. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू Lionel Messi अखेर भारत दौऱ्यावर दाखल झाला असून, त्यांच्या आगमनाने देशभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. शनिवारी पहाटे Messi याचे विमान कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले आणि याच क्षणापासून त्यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्याला अधिकृत सुरुवात झाली. विमानतळापासून शहरातील कार्यक्रम स्थळांपर्यंत Messi च्या स्वागतासाठी चाहत्यांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली.

भारत दौऱ्यावर आलेल्या फुटबॉल महानायक Lionel Messi याच्या बातमीने पुण्यातील फुटबॉलविश्वात उत्साहाची लाट उसळली आहे. Messi पुण्यात प्रत्यक्ष येणार नसले तरी त्याच्या भारत भेटीच्या चर्चेने शहरातील चाहत्यांमध्ये आनंद, आश्चर्य आणि जुन्या आठवणींचे भाव दाटून आले आहेत. पुण्यात अनेक ठिकाणी फुटबॉल चाहत्यांनी एकमेकांशी चर्चा, सोशल मीडियावर पोस्ट्स आणि सामूहिक कार्यक्रम आखत या क्षणाचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी हा क्षण स्वप्नपूर्तीप्रमाणे असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

पुण्यातील फुटबॉल चाहते आशीष पेंडसे यांनी सांगितले की युरोपमध्ये चाहत्यांना जागतिक दर्जाचे खेळाडू नियमित पाहायला मिळतात, मात्र भारतात अशी संधी क्वचितच मिळते. “अशा दिग्गज खेळाडूला जवळून पाहण्याची संधी मिळणे हे भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी सर्वोच्च क्षण ठरू शकतो,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी Pele, Diego Maradona आणि Lothar Matthaus यांच्या भारत भेटींच्या आठवणीही सांगितल्या, ज्यावेळी देशभरात असाच उत्साह पाहायला मिळाला होता.

पेंडसे यांच्या मते, आजची भारतीय तरुण पिढी युरोपियन फुटबॉलबाबत अत्यंत जागरूक आहे. ट्रान्सफर अपडेट्स, आकडेवारी, हायलाइट्स हे सर्व काही ते नियमितपणे फॉलो करतात. शाळकरी मुलांपासून ते काम करणाऱ्या तरुणांपर्यंत क्लब फुटबॉलविषयी मोठी उत्सुकता असून, अनेक फॅन ग्रुप्स सामन्यांचे सामूहिक स्क्रीनिंगही आयोजित करतात. पुण्यातही Messi च्या भारत दौऱ्यानिमित्त काही फुटबॉल क्लब आणि अकॅडमीकडून विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.

हेही वाचा: National Investigation Agency: तामिळनाडू ISIS कट्टरतावाद प्रकरणात NIA ची मोठी कारवाई; सात आरोपी आणि एका संस्थेवर आरोपपत्र

दरम्यान, Messi याच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. कोलकाता येथे Salt Lake Stadium मध्ये sponsors meet-and-greet, tribute programme, Mohun Bagan Messi All Stars आणि Diamond Harbour Messi All Stars यांच्यात प्रदर्शनीय सामना, मुलांसाठी Master Class with Messi, तसेच Lake Town येथे 70 फूट पुतळ्याचे virtual unveiling आणि lap of honour होणार आहे. हैद्राबाद येथे Rajiv Gandhi Stadium मध्ये सायंकाळचा कार्यक्रम, छोटा प्रदर्शनीय सामना, football clinic आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई मध्ये Wankhede Stadium येथे विशेष कार्यक्रम, 45 मिनिटांचा philanthropic fashion event आणि CCI येथे Padel Cup होणार आहे. Delhi मध्ये Messi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून Minerva Academy च्या युवा संघांचा सत्कार आणि nine-a-side celebrity match देखील आयोजित करण्यात आला आहे.

या सर्व कार्यक्रमांमुळे देशभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रशिक्षक वर्ग या उत्साहाकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहत आहे. स्वानंद सामक, SS Football Academy चे प्रशिक्षक, यांच्या मते Messi चा दौरा प्रेरणादायी असला तरी तो तात्पुरता परिणाम देईल. मात्र योग्य व्यवस्थापन, पारदर्शकता आणि दीर्घकालीन नियोजन केल्यास भारतीय फुटबॉलमध्ये मोठी झेप घेण्याची क्षमता असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Mumbai Girl Missing Case : भयंकर! मायानगरी मुंबईत बेपत्ता मुलींचे 1,187 गुन्हे दाखल; 10 महिन्यांचा धक्कादायक आकडा समोर, राज ठाकरेंचा सरकारला सवाल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number