India vs Australia U19 Test: भारतीय संघाला मोठा धक्का; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात गोलंदाज जखमी, स्ट्रेचरवरून न्यावे लागले रुग्णालयात

ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्धच्या पहिल्या युवा कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय 19 वर्षांखालील संघाला मोठा धक्का बसला आहे.
Pranav Raghavendra injury
युवा कसोटीत भारताला मोठा धक्का; प्रमुख गोलंदाज जखमी

India vs Australia U19 Test: ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्धच्या पहिल्या युवा कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय 19 वर्षांखालील संघाला मोठा धक्का बसला आहे. एकदिवसीय मालिकेत दिमाखदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ कसोटी सामन्यात वर्चस्व गाजवण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र, संघातील प्रमुख गोलंदाज प्रणव राघवेंद्र याला दुखापत झाल्याने भारतीय छावणीत चिंतेचे वातावरण पसरले. राघवेंद्रच्या पायाला दुखापत झाल्याचा प्राथमिक अंदाज असून त्याला तातडीने स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून वैद्यकीय अहवालाची वाट पाहिली जात आहे.

मोहित उलवा अन् इशान ओमचा सुरुवातीला धुमाकूळ

सामन्याची सुरुवात भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीने झाली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच हादरवले. मोहित उलवाने 3ऱ्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर हेडन बार्बुलोव्हिचला शून्य धावांवर माघारी धाडले. त्यानंतर ऑसी कर्णधार मॅथ्यू लॉफ यालाही केवळ 1 धावेवर पायचीत करत ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 बाद 7 धावा अशी केली. पाठोपाठ इशान ओमने दुसरा सलामीवीर नील पेटलची (11 धावा) शिकार करत ऑस्ट्रेलियाचा ३रा फलंदाज 27 धावांवर तंबूत परतवला.

हेही वाचा – Asian Games: भारताच्या लेकीनं मारली बाजी! 400 मीटरचा टप्पा 53.21 सेकंदात पार करत कांस्यपदकावर कोरले नाव

राघवेंद्रच्या दुखापतीनंतर ऑसी जोडीची भक्कम भागीदारी

भारताची पकड मजबूत असतानाच १० षटकांचा स्पेल पूर्ण केलेल्या राघवेंद्रला पायाच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याला चालणेही अशक्य झाल्याने सुरुवातीला व्हिलचेअर आणि नंतर स्ट्रेचरवरून रुग्णालयात स्कॅनसाठी नेण्यात आले. राघवेंद्र बाहेर गेल्यानंतर ऑसी फलंदाज झेड हॉलिक आणि ब्लॅक कॅटल यांनी संयमी फलंदाजी करत डाव सावरला. वृत्त लिहीपर्यंत ऑस्ट्रेलियाने 60 षटकांत 3 बाद 163 धावांपर्यंत मजल मारली होती. हॉलिक 56 तर कॅटल 90 धावांवर खेळत असून दोघांनी 136 धावांची भागीदारी रचली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version