Rishabh Pant Injured: आयपीएल 2026 मधील 23 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मात्र, या सामन्यात लखनौच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत निराशाजनक बातमी समोर आली आहे. डावाच्या सुरुवातीलाच संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाल्यामुळे मैदान सोडून जावे लागले आहे.
कशी झाली ऋषभ पंतला दुखापत?
लखनौच्या डावातील पाचवे षटक सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. आरसीबीचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवुडच्या तिसऱ्या चेंडूवर पंतने ‘क्रॉस-बॅटेड’ फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडूची गती आणि दिशा न समजल्याने तो थेट पंतच्या डाव्या कोपराला (Elbow) जाऊन लागला. हा फटका इतका जोरात होता की, पंतला मैदानावरच वेदनेने विव्हळताना पाहायला मिळाले. फिजिओने तातडीने मैदानावर धाव घेत त्याची तपासणी केली, परंतु पुढे खेळणे शक्य नसल्याने पंतला ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
हेही वाचा – IPL मधील ‘तो’ दिवस दोन खेळाडूंसाठी ठरला अविस्मरणीय; महाराष्ट्रासह बिहारच्या लेकाने पाडला ‘विकेट्स’चा पाऊस
.@RishabhPant17 forced to retire hurt after taking a blow to the elbow, a quiet walk off and anxious faces in the LSG camp ? How big a setback could this be? ?#TATAIPL | #IPLRivalryWeek 2026 ➡️ #RCBvLSG | LIVE NOW ? https://t.co/nyGp1mrMqj pic.twitter.com/qyEth1R0Ic — Star Sports (@StarSportsIndia) April 15, 2026
हेझलवुडची खिलाडूवृत्ती आणि लखनौची बिकट अवस्था
पंतला गंभीर दुखापत झाल्यानंतर आरसीबीच्या जोश हेझलवुडने उत्कृष्ट खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. त्याने पंतला धीर देत त्याच्या पाठीवर थाप मारली. मात्र, पंतच्या जाण्याने लखनौच्या फलंदाजीची लय पूर्णपणे बिघडली. पंतच्या जागी मैदानात आलेल्या निकोलस पूरनकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण तो अवघ्या 1 धावेवर हेझलवुडचा बळी ठरला. कर्णधार जखमी झाल्याने आणि पाठोपाठ विकेट पडल्याने लखनौचा संघ सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. पंतची ही दुखापत जर गंभीर असेल, तर आगामी सामन्यांमध्ये लखनौसाठी हे मोठे आव्हान ठरू शकते. सध्या सर्व क्रिकेट प्रेमी पंतच्या प्रकृतीबद्दल अपडेटची प्रतीक्षा करत आहेत.