Thursday, March 20, 2025 04:31:09 AM

मुजीब उर रहमान गझनफरची जागा घेतली, मुंबई इंडियन्सच्या संघात महत्त्वाचा बदल

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) संघात एक महत्त्वाचा बदल झाला आहे. अफगाणिस्तानच्या ऑफस्पिनर मुजीब उर रहमानने एएम गझनफरची  जागा घेतली

मुजीब उर रहमान गझनफरची जागा घेतली मुंबई इंडियन्सच्या संघात महत्त्वाचा बदल

मुंबई: आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) संघात एक महत्त्वाचा बदल झाला आहे. अफगाणिस्तानच्या ऑफस्पिनर मुजीब उर रहमानने एएम गझनफरची  जागा घेतली आहे. गझानफरला पाठदुखीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्यानंतर होणाऱ्या आयपीएल 2025 साठी खेळता येणार नाही. त्याला मागील महिन्यात जिम्बाब्वेच्या दौऱ्यात "L4 वर्टेब्राचा फ्रॅक्चर" झाल्याची माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली होती.

गझनफर, ज्याने त्याच्या अप्रतिम एकदिवसीय  कारकीर्दीमुळे आयपीएल करार मिळवला होता, गझनफर आता चार महिन्यांसाठी क्रिकेटमधून बाहेर राहणार आहे. या बदलामुळे मुंबई इंडियन्सला अनुभव आणि कौशल्य असलेला एक चांगला स्पिनर मिळाला आहे. मुजीब उर रहमानने २०१८ मध्ये पंजाब किंग्ससाठी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि तीन हंगामांमध्ये 18 सामने खेळले आहेत. त्याने 275 T20 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये 23.67 च्या सरासरीने आणि 6.75 च्या इकोनॉमी रेटने उत्कृष्ट गोलंदाजी केली.

मुजीबची कामगिरी दक्षिण आफ्रिकेतील SA20 मध्ये उत्कृष्ट होती, जिथे तो पार्ल रॉयल्ससाठी खेळत होता. त्याने 12 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आणि आपल्या संघाचा सर्वोच्च विकेट घेणारा गोलंदाज ठरला. या कामगिरीमुळे, गझनफरच्या जागी मुजीबने मुंबई इंडियन्समध्ये ₹२ कोटींमध्ये प्रवेश झाला 

आयपीएल 2025 मुजीबकडून मुंबई इंडिअन्सच्या संघ व्यापसथापनला आणि चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहील. गझानफरच्या अनुपस्थितीत, मुजीब मुंबईच्या स्पिन विभागाला मजबुती देईल आणि संघाच्या विजयासाठी  मुजीब महत्त्वाची भूमिका बजावेल. मुजीब हा नवीन चेंडूने गोलंदाजी टाकण्यासाठी ओळखला जातो. तो विश्वभर टी20 क्रिकेट खेळाला आहे. त्याच्याकडे 300 सामन्यांचा अनुभव आहे. 


सम्बन्धित सामग्री