Mumbai Indians Downfall | मुंबई इंडियन्सचं चुकतंय तरी काय ? का लागली संघाला उतरती कळा ?

मुंबईचं काय चुकत आहे ? मुंबईची चालू असलेली उतरती कळा थांबणार का?

Mumbai Indians Downfall | मुंबई इंडियन्सचं चुकतंय तरी काय ? का लागली संघाला उतरती कळा ?

मुंबई इंडियन्स आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने पाच वेळा आयपीएलचं खिताब जिंकलं आहे. मात्र हल्लीच्या काळात म्हणजेच २०२२ पासून मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. संघात बरेच बदलदेखील झाले, कर्णधार बदलले, बरेचसे प्रशिक्षकदेखील बदलून पहिले, मात्र जुन्या कामगिरीची कामगिरी पुनरावृत्ती झाली नाही. संघाची धुरा रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याकडे दिली गेली, त्यामुळे हार्दिक आणि मुंबईच्या संघाला चाहत्यांकडून आणि क्रिकेट तज्ज्ञांकडून आलोचनादेखील सहन करावी लागली, पण मुंबईचं काय चुकत आहे ? मुंबईची चालू असलेली उतरती कळा थांबणार का? हे जाणून घेऊ.

 

चुकीचे निर्णय – 

मुंबई इंडियन्सने अलीकडच्या काळात अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. रोहित शर्माची कर्णधारपदावरून हकालपट्टी करणे, कायरन पोलार्डला बळजबरीने निवृत्ती घ्यायला  लावणे, प्रशिक्षक महिला जयवर्धनेच्या ऐवजी मार्क बाऊचरला प्रशिक्षक बनवणे,दोन हंगामांनंतर त्याची हकालपट्टी करणे, २०१५ ते २०२३ या काळात गोलंदाजी प्रशिक्षक असणाऱ्या शेन बॉण्डला पदभारमुक्त करणं असे अनेक वादग्रस्त निर्णय मुंबईने घेतले. अजून एक मोठी चूक मुंबईने केली, ती म्हणजे मुंबईने खेळाडू शोधले, त्यांना योग्य ते वातावरण निर्माण करून दिले, प्रशिक्षण दिले मात्र कालांतराने त्यांना संघातून जाऊ दिलं, टीम डेव्हिड, मार्को जेनसन, ट्रिस्टन स्टब्स, डिव्हॉल्ड ब्रेव्हिस, रोमॅरिओ शेफर्ड असे अनेक खेळाडू मुंबईने जाऊ दिले.

कर्णधाराची निवड – 
रोहित शर्माची कर्णधारपदावरून हकालपट्टी करणे, त्या निर्णयाचा पश्चात्ताप मुंबईला नक्कीच होत असेल. रोहित शर्मा ज्याने दोन विश्वचषक, पाच आयपीएल आणि दोन चॅम्पियन्स लीग टी-२० रोहित शर्माने जिंकले. या दर्जाच्या कर्णधाराला अशी वागणूक देणं, मुंबई संघाच्या 'वन फॅमिली' ब्रीद वाक्याला शोभा देत नाही. मुंबईला हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यापूर्वी एका गोष्टीचा विसर पडताना दिसला, ती म्हणजे गुजरात संघाच्या यशात हार्दिक पांड्याएवढाच आशिष नेहराचा हात होता. ज्या खेळाडूंवर 'फिनिश्ड' खेळाडू असा टॅग लागलेला त्यांना घेऊन जेतेपद पटकावणं आणि त्यानंतर उपविजेतेपदापर्यंत जाणे सहसा शक्य होत नाही. 

हेही वाचा – Rohit Sharma: वानखेडेवर रोहितचा धमाका; RCB विरुद्ध मैदानात उतरताच 'हिटमॅन'ने रचला मोठा विक्रम, पाहा धोनी-रैना यांना कसं टाकलं मागे? 

विदेशी खेळाडूंची निवड – 
मुंबईची ताकद ही मुख्यतः त्यांचे विदेशी खेळाडू असायची. आपण सुरुवातीपासून जर बघितले, तर सनथ जयसूर्या, लसिथ मलिंगा, ड्वेन ब्राव्हो, कायरन पोलार्ड, मिचेल जॉन्सन, लेंडल सिमन्स, मिचेल मॅकक्लेनघन यांनी प्रदीर्घ काळ मुंबईसाठी चांगली कामगिरी केली. पण अलीकडच्या काळात मुंबईला चांगले विदेशी खेळाडू मिळाले नाहीत, तर काही खेळाडूंची  'नाव मोठं दर्शन छोटं' अशी कामगिरी राहिली. शेरफेन रदरफोर्ड आणि विल जॅक्स यांच्याकडून मुंबईला मोठ्या अपेक्षा आहेत. मुंबईला लागलेला हा श्राप या दोन खेळाडूंच्या रूपात तुटेल, अशी अपेक्षा आहे.
 
चांगल्या खेळाडूंना जाऊ देणे – 
गेल्या काही वर्षात मुंबईने असंख्य चांगले खेळाडू दुसऱ्या संघांना दान केले. मुंबईची उदयोन्मुख खेळाडूंना घेऊन खेळायची रणनीती मुंबईच्या अंगाशी येत आहे. टी-२० क्रिकेट हे जलद गतीने बदलत आहे. त्याला अनुसरून खेळण्यावर मुंबईने भर दिला पाहिजे. मोठ्या खेळाडूंना कसे ठेवता येईल याकडे मुंबईला भर देणे गरजेचे आहे. 

हेही वाचा – Viral Video: सामन्यापेक्षा जास्त व्हायरल ‘रो-को’ मोमेंट! रोहितने दिली रनआऊटची धमकी, कोहलीची रिअ‍ॅक्शन पाहा 

मुंबईच्या गोलंदाजीचा 'फॉर्म्युला' फिस्कटला – 
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सचा (MI) एकेकाळचा 'विनिंग फॉर्म्युला' गेल्या काही मोसमांपासून अपयशी ठरताना दिसत आहे. संघाने नेहमीच डाव्या हाताचा वेगवान परदेशी गोलंदाज, एक अनुभवी परदेशी वेगवान गोलंदाज, बुमराह, हार्दिक आणि दोन दर्जेदार फिरकीपटू असे समीकरण वापरले, परंतु आता हे गणित बिघडले आहे. 

फिरकी गोलंदाजीतील पोकळी –
 हरभजन सिंग, कृणाल पांड्या आणि राहुल चहर यांनी मधल्या षटकांमध्ये धावांवर नियंत्रण ठेवत विकेट्स काढल्या होत्या. पण २०२० नंतर पियुष चावला, मुरुगन अश्विन आणि शोकीन, मयंक मार्कंडे यांसारख्या गोलंदाजांना धावा रोखण्यात आणि बळी घेण्यात अपयश आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number