WPL 2027 लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय; 6 खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता, हरमनप्रीतसह 11 खेळाडू ठेवले कायम

बीसीसीआयने दिलेल्या डेडलाईननुसार मुंबईने 6 खेळाडूंना संघातून मुक्त केले असून 11 महत्त्वाच्या खेळाडूंवर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना कायम (Retain) ठेवले आहे.

WPL 2027 लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय; 6 खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता, हरमनप्रीतसह 11 खेळाडू ठेवले कायम
6 खेळाडूंना डच्चू देत मुंबई इंडियन्सची नवी रणनीती

MI WPL 2027 Released Players List: महिला प्रीमियर लीग (WPL) 2027 च्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघाने आपली रणनीती स्पष्ट करत रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची अधिकृत यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने दिलेल्या डेडलाईननुसार मुंबईने 6 खेळाडूंना संघातून मुक्त केले असून 11 महत्त्वाच्या खेळाडूंवर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना कायम (Retain) ठेवले आहे. अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सने आपली कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्याकडेच संघाचे नेतृत्व कायम ठेवले आहे. आता लिलावात मुंबईला रिलीज केलेल्या 6 खेळाडूंच्या जागी नवे पर्याय शोधावे लागणार आहेत.

हेही वाचा – भारतीय क्रिकेटपटूला मोठा धक्का! मैदानावरून चोरीला गेल्या लाखो रुपयांच्या बॅट; व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

हरमनप्रीतसह विदेशी आणि स्टार खेळाडू कायम

मुंबई इंडियन्सने रिटेन केलेल्या 11 खेळाडूंमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरसह अमनजोत कौर, हिली मॅथ्यूज, अमिला केर, नताली स्किव्हर ब्रंट, निकोला कॅरे, राहिला फिरडोस, एस सजना, संस्कृती गुप्ता, शबनिम इस्माईल आणि वैष्णवी शर्मा यांचा समावेश आहे. दुसरीकडे, मुंबईने कमालिनी जी, क्रांती रेड्डी, मिलि एलिंगवर्थ, पूनम खेमनार, सैका इशाक आणि त्रिवेणी वसिष्ठ या 6 खेळाडूंना संघातून रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. लिलावाच्या 1 महिना आधी बीसीसीआयला यादी सादर करणे बंधनकारक असल्याने मुंबईने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

 
View this post on Instagram
  A post shared by Star Sports India (@starsportsindia)

हेड कोच बदलल्यानंतर लिलावाकडे लक्ष

लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने आपल्या संघ व्यवस्थापनात मोठे बदल केले आहेत. गुरुवारीच मुंबईने महिला संघाच्या हेड कोचपदी ल्यूक विलियम्स यांची नियुक्ती केली होती. WPL 2027 चा लिलाव 28 ऑक्टोबर 2026 रोजी कोची येथे पार पडणार आहे. सर्व फ्रँचायझींनी रिलीज केलेल्या खेळाडूंची नोंदणी करून बीसीसीआय या लिलावाची प्रक्रिया पूर्ण करेल. आगामी डब्ल्यूपीएलचा मोसम 14 जानेवारी 2027 ते 7 फेब्रुवारी 2027 या कालावधीत खेळवला जाणार आहे. WPL 2026 मध्ये आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत ट्रॉफी जिंकली होती, त्यामुळे आता मुंबई इंडियन्स पुन्हा विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number