Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ; अजितदादांच्या निधनानंतर बिनविरोध निवड

बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या असोसिएशनच्या विशेष सर्वसाधारण सभेत मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ; अजितदादांच्या निधनानंतर बिनविरोध निवड

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या (MOA) रिक्त असलेल्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या असोसिएशनच्या विशेष सर्वसाधारण सभेत मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे हे पद रिक्त झाले होते.

राजकीय संघर्षातून समन्वयाकडे 
या निवडीमागे मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. मात्र, त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तडजोड होऊन अजित पवार अध्यक्ष तर मोहोळ उपाध्यक्ष झाले होते. आता अजित पवारांच्या पश्चात संघटनेची सूत्रे मोहोळ यांच्याकडे गेल्याने एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या नावाची होती चर्चा
अजित पवारांनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव या पदासाठी चर्चेत होते. त्या नुकत्याच खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून 'MOA' च्या सदस्य झाल्या होत्या. मात्र, वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मोहोळ यांच्या निवडीमुळे राज्यातील क्रीडा क्षेत्राला आता नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा – BCCI New Rules: मैदानावर शिस्त हवीच! रियान पराग आणि राजस्थान रॉयल्सच्या 'त्या' प्रकरणांनंतर BCCI संतापले; आता IPL संघांवर होणार थेट कारवाई

एका पर्वाचा शोकांतिकापूर्ण अंत
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. मुंबईहून निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना झालेल्या या भीषण दुर्घटनेत त्यांच्यासह 5 जणांनी प्राण गमावले. त्यांच्या निधनानंतर क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली होती, जी भरून काढण्यासाठी आता नवीन नियुक्त्या केल्या जात आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number