Novak Djokovic : टेनिस जगतातील महान खेळाडू नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये आपल्या नावावर एका सुवर्णविक्रमाची नोंद केली आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत विजय मिळवत जोकोविचने ग्रँड स्लॅम इतिहासात 400 सामने जिंकणारा जगातील पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. या कामगिरीसह त्याने रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे.
बोटिक व्हॅन डी झँडस्चल्पवर मात करत रचला इतिहास
तिसऱ्या फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या जोकोविचने बोटिक व्हॅन डी झँडस्चल्पचा 3-0 अशा सेटमध्ये पराभव केला. जोकोविचने पहिला सेट 6-3 आणि दुसरा सेट 6-4 अशा फरकाने सहज जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये त्याला कडवी झुंज मिळाली, ज्यामुळे हा सेट टायब्रेकरमध्ये गेला. अखेर जोकोविचने 7-6 (4) अशा फरकाने हा सेट आणि सामना खिशात टाकला. या विजयासह जोकोविचने प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे.
हेही वाचा - IND vs NZ 2nd T20: हार्दिक पंड्या माजी खेळाडूवर भडकला, भर मैदानात हातात बॅट घेऊन...
ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक विजय (पुरुष एकेरी):
नोवाक जोकोविच: 400 विजय
रॉजर फेडरर: 369 विजय
राफेल नदाल: 314 विजय
जिमी कॉनर्स: 233 विजय
आंद्रे अगासी: 224 विजय
नाओमी ओसाकाची स्पर्धेतून अनपेक्षित माघार
दुसरीकडे, महिला गटात जपानची स्टार खेळाडू आणि 4 वेळा ग्रँड स्लॅम विजेती नाओमी ओसाका हिने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. तिसऱ्या फेरीत तिची लढत मॅडिसन इंग्लिसशी होणार होती. ओसाकाने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. "कोर्टवर परतण्यासाठी मी शरीराला अधिक इजा पोहोचवण्याचा धोका पत्करू शकत नाही, त्यामुळे थांबणे आवश्यक आहे," असे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.