मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड असा झाला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अप्रतीम फलंदाजी करत 320 धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने 118, सलामीवीर विलियम यंगने 107 धावा केल्या तर अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने 39 चेंडूत 61 धावा केल्या.
पाकिस्तान संघाकडून बाबर आझम, सलमान आगा आणि खुशदिल शाह यांना वगळता कोणताच फलंदाज प्रभाव टाकू शकला नाही. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानची चॅम्पियन्स ट्रॉफीतील पुढची वाट अवघड झाली आहे. पाकिस्तानला या सामन्यातील पराभवासोबत अजून एक मोठा झटका लागला आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून दुखापतीमुळे बाहेर पडला. त्याला तिरकसीची दुखापती झाली आहे. त्याच्या संघात नसण्याने पाकिस्तानच्या फलंदाजीसाठी मोठा झटका ठरू शकतो. फखर हा पाकिस्तानच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातील एकमेव खेळाडू जो आक्रमक फलंदाजी करतो. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला ही दुखापत झाली. दुखापत होऊनही फखरने या सामन्यात फलंदाजी केली, 24 धावादेखील केल्या. फखर जमान हा एकमेव पाकिस्तानचा खेळाडू आहे ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका इंनिंगमध्ये 200 धावा केल्या आहेत.
फखर जमानचा बदली खेळाडू म्हणून इमाम उल हकला संघात स्थान मिळालं. इमाम शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना डिसेंबर 2023 मध्ये खेळाला होता. इमामने पाकिस्तानसाठी 72 एकदिवसीय सामन्यात 3138 धावा 48 च्या सरासरीने केले आहेत.