Monday, March 09, 2026 08:10:55 AM

Suryakumar Yadav Post: पाकिस्तानचा 'सूर्या'स्त! विश्वचषकात भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर सूर्यकुमार यादवने 'या' 3 शब्दांत विषय संपवला

आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, या विजयाइतकीच चर्चा सध्या कर्णधार सूर्यकुमार यादवच्या एका सोशल मीडिया पोस्टची होत आहे.

suryakumar yadav post पाकिस्तानचा सूर्यास्त विश्वचषकात भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर सूर्यकुमार यादवने या 3 शब्दांत विषय संपवला

Suryakumar Yadav Post: टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने पुन्हा एकदा आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली आहे. आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, या विजयाइतकीच चर्चा सध्या कर्णधार सूर्यकुमार यादवच्या एका सोशल मीडिया पोस्टची होत आहे, ज्याने जणू पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

काय आहे 'सूर्या'ची ती व्हायरल पोस्ट?
सामना संपल्यानंतर कर्णधार सूर्याने टीम इंडियाच्या विजयाचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंना त्याने दिलेले कॅप्शन सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. त्याने केवळ ‘हर हर महादेव’ असे 3 शब्द लिहिले आणि भारतीय चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर सूर्याची ही साधी पण प्रभावी पोस्ट चाहत्यांच्या काळजाला भिडली आहे.

भारताची ऐतिहासिक कामगिरी
भारताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकाच्या इतिहासातील 175 धावांचा सर्वोच्च डोंगर उभा केला. सलामीवीर ईशान किशनने 77 धावांची स्फोटक खेळी करत डावाचा पाया रचला. त्यानंतर तिलक वर्मा, शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांनी शेवटच्या षटकांत फटकेबाजी करत धावसंख्या 175 पर्यंत नेली. 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची दाणादाण उडाली. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी सुरुवातीलाच धक्के दिल्याने पाकिस्तानचा डाव 114 धावांतच आटोपला.

हेही वाचा -  India Vs Pakistan Match: कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला नमवून भारताचा सुपर-8 मध्ये दिमाखात प्रवेश, 6 पॉईंट्सने पोहोचला पहिल्या स्थानावर

कर्णधार काय म्हणाला?
विजयानंतर बोलताना सूर्यकुमार यादवने रणनीतीबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, "या खेळपट्टीवर 155 धावा देखील आव्हानात्मक होत्या, पण आमच्या फलंदाजांनी 175 पर्यंत मजल मारून काम सोपे केले. विशेषतः ईशान किशनने ज्या पद्धतीने डाव सावरला, ते कौतुकास्पद आहे." या विजयामुळे भारताने सुपर-8 फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले असून संपूर्ण देशात सध्या जल्लोषाचे वातावरण आहे.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या