Payal Nag : सलाम तिच्या जिद्दीला! हात-पाय नसतानाही जिद्दीच्या जोरावर कोरले सुवर्णपदकावर नाव

या रोमांचक अंतिम लढतीची सुरुवात अत्यंत चुरशीची झाली. सामना कोणाकडेही झुकू शकत होता. मात्र, जसजसा खेळ पुढे सरकला, तसतसा पायलने आपला संयम ढळू दिला नाही.

Payal Nag : सलाम तिच्या जिद्दीला! हात-पाय नसतानाही जिद्दीच्या जोरावर कोरले  सुवर्णपदकावर नाव

Payal Nag Defeats Sheetal Devi in Archery : बँकॉकमध्ये आयोजित जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत भारताच्या पायल नाग हिने एका विलक्षण विजयाची नोंद करत क्रीडा विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. दोन्ही हात आणि पाय नसतानाही केवळ जिद्दीच्या जोरावर पायलने महिलांच्या कंपाउंड वैयक्तिक गटात आपलीच सहकारी आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या शीतल देवीवर मात केली. अंतिम सामन्यात पायलने 139-136 असा विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या विजयामुळे पायल नाग ही पॅरा तिरंदाजीतील एक नवीन उगवती तारा म्हणून समोर आली आहे.

अटीतटीचा सामना आणि पायलचा संयम
या रोमांचक अंतिम लढतीची सुरुवात अत्यंत चुरशीची झाली. पहिल्या दोन फेऱ्यांनंतर दोन्ही तिरंदाजांमध्ये 54-54 अशी गुणांची बरोबरी होती, ज्यामुळे सामना कोणाकडेही झुकू शकत होता. मात्र, जसजसा खेळ पुढे सरकला, तसतसा पायलने आपला संयम ढळू दिला नाही. दबावाच्या परिस्थितीत तिने अत्यंत शांतपणे आणि अचूक नेमबाजी करत निर्णायक आघाडी मिळवली. वर्षभरापासून तिरंदाजी विश्वात वर्चस्व गाजवणाऱ्या 19 वर्षीय शीतल देवीला नमवणे सोपे नव्हते, पण पायलने आपल्या कौशल्याने हे अशक्य वाटणारे काम करून दाखवले.

हेही वाचा – IPL 2026 Orange Cap: काही तासांतच गेम पलटला! रिझवीच्या तुफानी खेळीने रोहितकडून हिसकावली ऑरेंज कॅप

पात्रता फेरी ते सुवर्णपदकापर्यंतचा प्रवास
शीतल देवीने या स्पर्धेतही आपला दबदबा कायम राखत पात्रता फेरीत 698 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. 2025 च्या मोसमात तिने जगभरात आपली ओळख निर्माण केली असली तरी, पायल नागने पात्रता फेरीत 678 गुणांसह तिसरे स्थान मिळवून आपली दावेदारी आधीच सिद्ध केली होती. विशेष म्हणजे, वैयक्तिक गटात एकमेकींविरुद्ध खेळण्यापूर्वी पायल आणि शीतल यांनी दुहेरी गटात एकत्र खेळताना भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. मात्र, वैयक्तिक सुवर्णपदकाच्या लढतीत पायलने संधीचे सोने करत बाजी मारली.

भारताचे पदकतालिकेत वर्चस्व
केवळ पायलच नाही, तर इतर भारतीय खेळाडूंनीही बँकॉकमध्ये तिरंगा फडकवला. पुरुषांच्या कंपाउंड ओपन प्रकारात जागतिक विजेता तोमन कुमारने ऑस्ट्रेलियाच्या जोनाथन मिल्नेचा 146-142 असा पराभव करून सुवर्णपदकाची हॅटट्रिक पूर्ण केली. पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता हरविंदर सिंग याला मात्र रिकर्व्ह गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या संपूर्ण स्पर्धेत भारताने 7 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह एकूण 13 पदके जिंकून पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

हेही वाचा – Rohit Sharma Record: रोहित शर्माचा ऐतिहासिक विक्रम; धोनी-विराटच्या पंक्तीत मिळवले स्थान

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number