Sunday, November 16, 2025 11:54:08 PM

Parvez Rasool Retirement : टीम इंडियाचा पहिला काश्मिरी खेळाडू परवेझ रसूल निवृत्त

परवेझ रसूलने 17 वर्षांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 352 विकेट्स घेतल्या आणि 5,648 धावा केल्या, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त 2 सामने खेळले.

parvez rasool retirement  टीम इंडियाचा पहिला काश्मिरी खेळाडू परवेझ रसूल निवृत्त

Parvez Rasool Retirement: टीम इंडियाचा पहिला काश्मिरी खेळाडू परवेझ रसूल यांनी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 36 वर्षीय रसूलने बीसीसीआयला निवृत्तीची माहिती दिली. परवेझ रसूलने 17 वर्षांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 352 विकेट्स घेतल्या आणि 5,648 धावा केल्या, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त 2 सामने खेळले. 

टीम इंडियासाठी पदार्पण

रसूलने सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी पदार्पण केले. 15 जून 2014 रोजी मिरपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध टी20मध्ये त्याने पदार्पण केले, तर 2.5 वर्षांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध कानपूरमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला.

रणजी ट्रॉफीत चमकदार कामगिरी

रणजी ट्रॉफीमध्ये रसूलने दोनदा लाला अमरनाथ ट्रॉफी जिंकली (2013/14 आणि 2017/18), जे त्याच्या उत्कृष्ट अष्टपैलुत्वाचे आणि संघासाठी योगदानाचे प्रतीक आहे. त्यांनी जम्मू-काश्मीर संघाचा नेतृत्व करत अनेक मोठे विजय मिळवले.

हेही वाचा - BWF World Junior Championships: तन्वी शर्माची ऐतिहासिक कामगिरी! जागतिक ज्युनियर स्पर्धेत मिळवले रौप्य पदक

2012-13 मध्ये जम्मू आणि काश्मीरसाठी रसूलने 594 धावा आणि 33 विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. गेल्या काही दिवसांपासून तो तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देणे यावर तो लक्ष केंद्रित करत होता.

हेही वाचा - IND vs AUS: पराभवानंतरही कॅप्टन गिल खुश? सामन्याबद्दल केले धक्कादायक खुलासे; म्हणाला 'मैदानावर केलेली मेहनत...

निवृत्ती नंतरचे ध्येय

रसूलने स्पोर्टस्टारशी बोलताना सांगितले, जेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली, तेव्हा जम्मू आणि काश्मीर क्रिकेटला फारसे गांभीर्याने घेतले जात नव्हते. पण आम्ही मोठ्या संघांना पराभूत केले आणि रणजीसह अनेक बीसीसीआय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्याला अलीकडेच बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सकडून Level-2 Coaching Certificate मिळाले असून, आता त्याचे लक्ष पूर्णवेळ प्रशिक्षण देणे, तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करणे आणि परदेशी लीगमध्ये भाग घेण्यावर आहे.
 


सम्बन्धित सामग्री