आशियाई खेळांमध्ये भारतीय खेळाडू पदकांची लयलूट करताना दिसत आहेत. देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय अॅथलीट्सच्या या दमदार कामगिरीमुळे आशियाई खेळ 2026 मधील भारताच्या एकूण पदकांची संख्या 46 वर पोहोचली आहे. यामध्ये भारताने आतापर्यंत 4 सुवर्णपदकांसह 21 रौप्य आणि कांस्यपदके जिंकली आहेत. यात विथ्या रामराजने 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकत दिग्गज धावपटू पीटी उषा यांचा 42 वर्षांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे.
28 सप्टेंबर सोमवारी, 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गुलवीर सिंगने आपली सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. तर दुसरीकडे महिला धावपटू विथ्या रामराजने 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. विथ्याने भारताच्या दिग्गज धावपटू पीटी उषा यांचा तब्बल 42 वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
हेही वाचा – भालाफेक स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी; यश वीर सिंगला रौप्य, तर रोहित यादवला कांस्य पदक
विथ्या रामराजने पीटी उषा यांचा 42 वर्षांचा विक्रम मोडला
महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत विथ्या रामराजने अवघ्या 54.75 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी तर ठरलीच. याबरोबरच तिने 1984 च्या लॉस एंजिल्स ऑलिंपिकमध्ये पीटी उषा यांनी नोंदवलेला 55.42 सेकंदांचा 42 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. आता हा राष्ट्रीय विक्रम अधिकृतपणे विथ्या रामराजच्या नावावर नोंदवला गेला आहे.
चालू आशियाई खेळांमधील विथ्या रामराजचे हे दुसरे पदक आहे. याआधी तिने 4×400 मीटर मिक्स रिले संघात रौप्यपदक जिंकले होते