मुंबई: सध्या आयपीएलचा सीझन सुरू असून क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच, आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये पंजाब किंग्ज 19 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. यासह, आरसीबी 19 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, जरी त्याचा नेट रन रेट कमी असला तरी. तसेच, 18 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर गुजरात टायटन्स आहे. सोबतच, मुंबई इंडियन्स 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
'हा' टीम आहे पहिल्या क्रमांकावर:
पहिल्या क्रमांकावर असलेल्या टीमने 5 वेळा आयपीएल जिंकले आहे. त्यापैकी 'मुंबई इंडियन्स' या टीमने 3 वेळा जिंकले आहे. तसेच केकेआर आणि गुजरातने प्रत्येकी एकदा जिंकले आहे.
दुसऱ्या क्रमांकाच्या संघाचे वर्चस्व:
आकडेवारीनुसार पाहिले तर, पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या टीमने 8 वेळा विजेतेपद जिंकले आहे. यापैकी चेन्नई सुपर किंग्जने 4 वेळा विजेतेपद जिंकले आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांची स्थिती:
आयपीएलमध्ये, टॉप 2 व्यतिरिक्तच्या टीमने फक्त एकदाच विजेतेपद जिंकले आहे. 2016 मध्ये, हैदराबादने तिसऱ्या स्थानावर असूनही विजेतेपद जिंकले होते.
'ही' टीम जिंकू शकते विजेतेपद:
यावेळी, आयपीएलमध्ये आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, पॉइंट टेबलच्या जुन्या रेकॉर्डनुसार, आयपीएल जिंकण्याची आरसीबीची शक्यता जास्त दिसत आहे.
आरसीबी पोहोचला अंतिम फेरीत:
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) टीम देखील अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी क्वालिफायर 1 मध्ये पंजाबला हरवले आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार, 2011 मध्ये क्वालिफायर सुरू झाल्यापासून, 14 वेळा क्वालिफायर 1 जिंकणाऱ्या या टीमने 11 वेळा विजेतेपद जिंकले आहे.