Monday, May 11, 2026 11:14:46 AM

RCB Team Winning Strategy | विराट कोहली असूनही सतत हार; पण 'या' व्यक्तींमुळे संपला ट्रॉफीचा दुष्काळ

विराट कोहली असूनही सतत हार; पण 'या' व्यक्तींमुळे संपला ट्रॉफीचा दुष्काळ

rcb team winning strategy |  विराट कोहली असूनही सतत हार पण या व्यक्तींमुळे संपला ट्रॉफीचा दुष्काळ

‘नाम बडे और दर्शन छोटे’ असं आरसीबी बाबतीत नेहमी म्हटलं जायचं. विराट कोहली, ख्रिस गेल आणि डिव्हिलिअर्स यांच्यासारखे मोठे खेळाडू असूनही आरसीबी जिंकत नाही. या गोष्टीवरून आरसीबीला समाज माध्यमांवर ट्रोल केलं जायचं, पण गेल्या पाच आयपीएलच्या हंगामात आरसीबी चार वेळा टॉप 4 साठी पात्र ठरले  आणि यात एकदा जिंकून ट्रॉफीचा दुष्काळदेखील आरसीबीने संपवला, पण जे गेल्या काही वर्षात होतंय तो एक निव्वळ चमत्कार नसून त्यामागे मेहनत आणि चांगले निर्णय आहेत. नेहमी खेळाडू हे कोणत्याही संघाचा चेहरा असतात, पण जेवढी मेहनत खेळाडू घेतात तेवढीच प्रशिक्षकदेखील घेतात. तर हे खेळाडू होते आपण जाणून घेऊ. 
 

हेही वाचा CSK vs RCB Controversy: IPL 2026 मध्ये राडा, स्टेडियमवरील 'त्या' गाण्यावरून CSK आक्रमक; RCB विरोधात BCCI कडे तक्रार

 

  • माईक हेसन - 
    आता जी बलशाली आरसीबी दिसते तिचा पाया माईक हेसनने उभारला. तो आरसीबीसोबत 2019- 2023 या कार्यकाळात होता. त्याने आरसीबीसाठी अनेक चांगले निर्णय घेतले आणि मुख्य म्हणजे त्याने आरसीबीला योग्य दिशेने नेलं. त्याच्या काळात देवदत्त पडिकल, रजत पाटीदार, हर्षल पटेल, विल जॅक्स, जोश हेजलवूड, ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ ड्यू  प्लेसी सारखे चांगले खेळाडू संघात आणले. याचा फायदा आरसीबीला झाला. आरसीबीचा इतर संघांप्रमाणे एक चांगला 'कोर' बनला. आरसीबीची मुख्य समस्या होती ती म्हणजे गोलंदाजी, ती समस्यादेखील त्याने बऱ्यापैकी सोडवली. त्याच्या कार्यकाळात हर्षल पटेलने पर्पल कॅप जिंकली. सिराज, चहल आणि जोश हेजलवूडसारखे चांगले गोलंदाज घेऊन संघाला बळ दिलं.

 

  • दिनेश कार्तिक - 

दिनेश कार्तिकने 2022-2024 या काळात आरसीबीसाठी खेळाडू म्हणून चांगली कामगिरी केली. 2024 मध्ये निवृत्ती घेतली. त्यानंतर त्याने फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक या पदाची धुरा सांभाळली. त्याच्या मार्गदर्शनाखाली आरसीबीने पहिल्याच वर्षी जेतेपद पटकावले. लिलावाआधीच्या बैठकांमध्ये तो किती हुशारीने विचार करतो हे सगळ्यांनीच समाज माध्यमांवर पाहिलं. आरसीबीच्या यशात दिनेश कार्तिकचा मोठा वाटा आहे. त्याचा मैदानावरचा अनुभव आरसीबीला कामी येत आहे. 

हेही वाचा Who Will Be the New Captain on Team India | IPL मध्ये दमदार परफॉर्मन्स, भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदी कोणाची वर्णी?

  • अँडी फ्लॉवर -

अँडी फ्लॉवर हा जागतिक क्रिकेटमधील अत्यंत यशस्वी आणि प्रभावशाली प्रशिक्षकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. 2009 ते 2014 या काळात इंग्लंड संघाचे संचालक असताना त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यांच्याच कार्यकाळात इंग्लंडने 2010 चा आयसीसी T20  विश्वचषक जिंकला आणि 2011 मध्ये कसोटी क्रमवारीत जगात प्रथम स्थान पटकावले. विशेष म्हणजे, त्यांनी इंग्लंडला तीन वेळा 'ॲशेस' (2009, 2010/11 आणि 2013) जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली, ज्यात ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयाचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच फ्रँचायझी क्रिकेटमध्येही त्यांचा दबदबा असून त्यांनी मुलतान सुलतान्स (पीएसएल), गल्फ जायंट्स (आयएलटी20), ट्रेंट रॉकेट्स (द हंड्रेड) आणि मराठा अरेबियन्स यांसारख्या विविध संघांना विजेतेपद मिळवून देत आपली अष्टपैलू प्रशिक्षण क्षमता सिद्ध केली आहे. आरसीबीला जेतेपद जिंकवून त्याने आयपीएलमध्येदेखील त्याचं नाव मोठं केलंच, पण आरसीबीचा ट्रॉफीचा दुष्काळदेखील संपवला. त्याची खेळाडूंची पारख आणि निर्णय क्षमतेचा आरसीबीला फायदा होत आहे. अँडी फ्लॉवर ऑगस्ट 2023 पासून बंगळुरूसोबत आहेत.  

 

 

  • मोहम्मद बोबॅट - 
    मोहम्मद बोबॅट - रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा क्रिकेट संचालक आहे. त्याने स्पोर्ट्स डायरेक्टरशिपमध्ये मास्टर्स, स्पोर्ट्स सायन्स अँड मॅनेजमेंटमध्ये बीएससी ऑनर्स आणि एज्युकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट मिळवले आहे. मोहम्मद बोबॅट ने ईसीबी लेव्हल 4 मास्टर कोच पात्रता देखील प्राप्त केली आहे आणि तो यूके स्पोर्टच्या फ्युचर लीडर्स प्रोग्रामच्या पहिल्या तुकडीचा पदवीधर होता. 
    मो बोबॅट हा एक क्रिकेट रणनीतीकार असून त्यांनी इंग्लंडसोबत 12 वर्षे काम केले आहे. इंग्लंडच्या 2019 एकदिवसीय विश्वचषक विजयात आणि 2022 टी-20 विश्वचषक विजयांत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. सध्या ते RCB चे क्रिकेट संचालक म्हणून कार्यरत असून डेटा-आधारित कामगिरीवर त्यांचा विशेष भर आहे. सप्टेंबर 2023 मध्ये तो आरसीबीसोबत जोडला गेला. त्याने घेतलेल्या निर्णयांवर पहिली शंका उपस्थित केली गेली मात्र त्याची दूरदृष्टी नंतर लोकांना समजली. 

सम्बन्धित सामग्री