अहमदाबाद: 3 जून रोजी ऐतिहासिक आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना पंजाब किंग्जसोबत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या दोन संघांना अद्यापही ट्रॉफी मिळाली नाही, अशा दोन संघांचा सामना आपल्याला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 3 जून रोजी पाहायला मिळेल. सायंकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. यापैकी एका संघासाठी 18 वर्षांचा आयपीएल ट्रॉफी नसण्याचा शाप संपणार आहे. पण कोणत्या संघासाठी? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
आरसीबी विरुद्ध पीबीकेएस येणार आमने-सामने:
आतापर्यंत बेंगळुरू आणि पंजाब यांनी एकमेकांविरुद्ध 36 आयपीएल सामने खेळले आहेत. तसेच, दोघांमध्ये काहीही वेगळे नाही. याचं कारण म्हणजे दोन्ही संघांनी प्रत्येकी 18 सामने जिंकले आहेत. मात्र, यावर्षी आरसीबी आघाडीवर आहे. आरसीबीने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. क्वालिफायर 1 मधील शक्तिशाली वर्चस्व तर न विसरण्यासारखे आहे.
कोणता संघ जाणार फायनलमध्ये?
आरसीबी विरुद्ध पीबीकेएस आयपीएल 2025 फायनलबद्दल एआय काय भाकीत करत आहे ते जाणून घेऊया.
'आरसीबीकडे वेग, प्लेऑफचा अनुभव आणि फॉर्म आहे. पण अंतिम सामन्यात, दबावामुळे सर्व फायदे नष्ट होतात. जर पीबीकेएसच्या टॉप ऑर्डरने चांगली कामगिरी केली आणि त्यांनी सुरुवातीच्या काळात यश मिळवले तर ते नक्कीच विजय मिळवू शकतात', असा अंदाज चॅटजीपीटीने वर्तवला आहे.
'तरीदेखील आरसीबी आघाडीवर आहे. तसेच, हे वर्ष अखेर त्यांच्यासाठी शाप मोडण्याचे वर्ष असू शकते,' असेदेखील त्यात म्हटले आहे. 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कमी फरकाने जिंकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांचा 18 वर्षांचा ट्रॉफी दुष्काळ संपेल', असं मत ग्रोकने मांडले आहे.
एआय टूल काय भाकीत करत आहे?
'जर पीबीकेएसने प्रथम फलंदाजी करून 180+ धावा केल्या तर अर्शदीप आणि चहल यांच्या नेतृत्वाखाली त्यांची गोलंदाजी स्पर्धात्मक बनवू शकते. परंतु आरसीबीचा फॉर्म आणि मॅचअप फायदे त्यांना धार देतात', असं एआय टूलने म्हटले आहे. गुगल जेमिनीने असे भाकीत केले आहे की, 'श्रेयस अय्यरचा पंजाब किंग्ज ट्रॉफी जिंकेल'.
'पंजाब किंग्ज आयपीएल 2025 चा ट्रॉफी जिंकेल. ही एक चुरशीची स्पर्धा असेल, परंतु पीबीकेएसची लढाऊ वृत्ती आणि उच्च दबावाच्या परिस्थितीत श्रेयस अय्यरचे नेतृत्व त्यांना झेप घेऊ शकते आणि त्यांची 18 वर्षांची प्रतीक्षा मोडू शकते', असेही भाकीत करण्यात आले आहे.
आरसीबी विरुद्ध पीबीकेएस आयपीएल 2025 फायनलबद्दलची माहिती:
फलंदाज: विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, प्रभसिमरन सिंग
अष्टपैलू: मार्कस स्टॉइनिस, रोमॅरियो शेफर्ड
गोलंदाज: जोश हेजलवूड, युझवेंद्र चहल, हरप्रीत ब्रार
विकेटकीपर: जोश इंग्लिस, जितेश शर्मा
कोण जिंकणार आयपीएल 2025 फायनल?
गुगल मॅच प्रेडिक्शननुसार, बेंगळुरूला जिंकण्याची 52% शक्यता आहे.
श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्स (2020), कोलकाता नाईट रायडर्स (2024) आणि पंजाब किंग्ज (2025) या तीन संघांना अंतिम फेरीत नेणारा पहिला कर्णधार बनून इतिहास पुन्हा लिहिला आहे. त्यामुळे आयपीएल 2025 मध्ये कोणता संघ ट्रॉफी जिंकेल? तसेच कोणता संघ आयपीएलच्या इतिहासात एक अध्याय जोडेल हे पाहणे महत्वाचे आहे.