RCB vs GT IPL Final 2026: आरसीबी विरुद्ध गुजरात हाय-व्होल्टेज सामना! विजेत्या संघावर पैशांचा वर्षाव; उपविजेत्याला किती रुपये मिळणार? जाणून घ्या A टू Z माहिती

आज आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2026 चा अंतिम सामना पार पडणार असून विजेत्या संघाला ट्रॉफीसह खास बक्षीस रक्कम देखील दिली जाणार आहे, तसेच उपविजेत्या संघाला देखील कोट्यवधी रुपये मिळेले.

RCB vs GT IPL Final 2026: आरसीबी विरुद्ध गुजरात हाय-व्होल्टेज सामना! विजेत्या संघावर पैशांचा वर्षाव; उपविजेत्याला किती रुपये मिळणार? जाणून घ्या A टू Z माहिती

आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2026 चा हाय-व्होल्टेज अंतिम सामना पार पडणार आहे. आरसीबीने क्वालिफायर 1 जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले, तर गुजरातने क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सला हरवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. तर आज या सामन्यातून आयपीएल 2026 चा विजेता संघ मिळणार आहे, त्यामुळे या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघाकडे आतापर्यंत एक-एक अशी आयपीएल ट्रॉफी आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपले दुसरे विजेतेपद पटकावून इतिहास रचण्यासाठी सज्ज आहेत. दरम्यान दोघांपैकी एक संघ विजेता तर दुसरा संघ उपविजेता होणार आहे. आयपीएलच्या विजेत्या संघाला ट्रॉफीसह खास बक्षीस रक्कम देखील दिली जाणार आहे, तसेच उपविजेत्या संघाला देखील कोट्यवधी रुपये मिळतील. 

हेही वाचा- IPL 2026 GT vs RCB Final : पावसामुळे सामना रद्द झाला तर विजेता कसा ठरेल? डकवर्थ-लुईस की लीग पॉइंट्स; नियम काय सांगतो?

विजेत्या-उपविजेत्या व्यतिरिक्त 'या' दोन संघांनाही मिळणार रोख रक्कम
आयपीएल 2026 च्या विजेत्या संघाला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार असल्याची माहिती आहे. तसेच उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आाहे. त्याचसोबत प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या इतर दोन संघांनाही म्हणजेच राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद देखील बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. यावेळी राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 मध्ये पोहोचल्यामुळे या संघाला 7 कोटी रुपये मिळतील, तर एलिमिनेटरमध्ये पराभूत झाल्यामुळे सनरायझर्स हैदराबादला 6.5 कोटी रुपये मिळतील. 

पावसामुळे अंतिम सामना रद्द झाला तर….
आजचा सामना अहमदाबादमधील हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. जर आज अहमदाबादमध्ये पाऊस पडला आणि अंतिम सामन्यावर हवामानाचा परिणाम झाला तर हा सामना रद्द झाल्यास विजेता संघ कसा ठरवला जाईल? आयपीएल नियमानुसार, जर सामना पावसामुळे रद्द झाला, तर तो राखीव दिवशी खेळवला जातो. मात्र जर राखीव दिवशीही सामना खेळला गेला नाही, तर तो रद्द केला जाईल. तसेच विजयी संघ निवडताना आयपीएल 2026 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित केला जाईल. त्याप्रमाणे आरसीबी हा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असल्यामुळे विजयी म्हणून आरसीबीची घोषणा होईल. दरम्यान दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच स्वप्न कोणाचं पूर्ण होत हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number