Rohit Sharma: "फिटनेस, कामगिरीसह भविष्यावर लक्ष द्या…" BCCI कडून रोहित शर्माला स्पष्ट आदेश

बीसीसीआयने रोहित शर्माला फिटनेस आणि वनडे कामगिरीवर लक्ष देण्याचा सल्ला देत निवृत्तीच्या चर्चांपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Rohit Sharma: &quotफिटनेस, कामगिरीसह भविष्यावर लक्ष द्या…&quot BCCI कडून रोहित शर्माला स्पष्ट आदेश

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (Board of Control for Cricket in India) अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला त्याच्या फिटनेस आणि एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या भविष्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर सार्वजनिक प्रतिक्रिया देणे टाळण्याचे निर्देश दिले आहेत. रोहित शर्मा 29 जून 2024 रोजी ट्वेंटी-ट्वेंटी (T20) आणि 7 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. निवृत्तीनंतर तो आता फक्त वनडे सामन्यांसाठी भारताचे प्रतिनिधित्व करतो.

गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियातील तीन सामन्यांच्या मालिकेपूर्वी त्याच्या वनडे भवितव्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र त्या मालिकेत त्याने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकत मालिकावीर पुरस्कार पटकावला. त्यामुळे रोहितच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवर पूर्णविराम लागला. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता तो 30 नोव्हेंबर, 3 डिसेंबर आणि 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघासाठी खेळणार आहे. हे सामने अनुक्रमे रांची, रायपूर आणि विशाखापट्टणम येथे होणार आहेत.

हेही वाचा: Smriti-Palash Wedding:स्मृती आणि पलाशचं लग्न लवकरच? पलाशच्या आईने दिली महत्त्वाची माहिती

टाईम्स ऑफ इंडिया मध्ये 29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, बीसीसीआयने रोहितला त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीवर, फलंदाजीतील स्थिर कामगिरीवर आणि वनडे फॉरमॅटमधील भूमिकेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे. बीसीसीआयच्या एका सूत्रानुसार, बोर्डाची अपेक्षा आहे की रोहितने आपला नैसर्गिक आक्रमक खेळ कायम ठेवावा. ऑस्ट्रेलियातील परिस्थिती कठीण असली तरी काही प्रसंगी त्याने अनावश्यक जोखीम टाळल्याचे दिसून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार “रोहित आणि विराट यांनी फलंदाजीच्या फळीचे नेतृत्व ठामपणे करत राहणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तरुण खेळाडूंना मोठा आधार मिळतो.” आगामी कार्यक्रमाचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर बीसीसीआय निवड समिती आणि संघ व्यवस्थापन यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने रोहित आणि विराटच्या भूमिकांवर सविस्तर चर्चा केली जाईल. बीसीसीआयच्या सूत्राने पुढे म्हटले, “रोहित आणि कोहलीसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंना त्यांच्या भूमिकांविषयी स्पष्टता देणे अत्यंत आवश्यक आहे. अनिश्चिततेच्या वातावरणात ते खेळू शकत नाहीत.”

हेही वाचा: Hajj Yatra: हज यात्रेकरूंच्या सोयीसाठी मोठे बदल! सामान्य नागरिक 5 वर्षांच्या हप्त्यांत पैसे भरू शकतात; जाणून घ्या, केंद्र सरकारचा नवा नियम

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number