Vijay Hazare Trophy: रोहित-विराटसह ‘या’ स्टार खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी खेळणे बंधनकारक; फक्त एका खेळाडूला देण्यात आली सूट

टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या सर्व खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफीमध्ये किमान दोन सामने खेळणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Vijay Hazare Trophy: रोहित-विराटसह ‘या’ स्टार खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी खेळणे बंधनकारक; फक्त एका खेळाडूला देण्यात आली सूट

Vijay Hazare Trophy: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेट अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या सर्व खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफीमध्ये किमान दोन सामने खेळणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयातून श्रेयस अय्यर याला सूट देण्यात आली आहे. सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळत असून ही मालिका 19 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर संघाला पुढील न्यूझीलंड मालिकेपूर्वी दीर्घ विश्रांती मिळणार आहे. ही विश्रांती खेळाडूंनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळून फिटनेस आणि फॉर्म टिकवण्यासाठी वापरावी, असा बोर्डाचा स्पष्ट संदेश आहे.

हेही वाचा – Lionel Messi: मेस्सी टी20 विश्वचषक पाहण्यासाठी पुन्हा भारतात येणार; जय शाहांनी फुटबॉलपटूला दिली 'ही' खास भेट

या निर्णयामागे यंदा ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेतील निराशाजनक कामगिरीही कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. त्या मालिकेनंतर बीसीसीआयने खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या. बीसीसीआयच्या निर्देशानुसार, रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, केएल राहुल, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांसारखे वरिष्ठ खेळाडू विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या राज्य संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. विराट कोहलीने आधीच आपली उपलब्धता निश्चित केली आहे.

हेही वाचा –Squash World Cup मध्ये भारताने रचला इतिहास; हाँगकाँगवर 3-0 ची दणदणीत मात 

दरम्यान, दुखापतीमुळे अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर राहिलेल्या श्रेयस अय्यरला या नियमातून वगळण्यात आले आहे. तो सध्या दुखापतीतून सावरत असल्याने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विजय हजारे ट्रॉफीमध्ये 24 डिसेंबरपासून न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेपर्यंत सहा फेऱ्या होणार आहेत. खेळाडू आणि संबंधित राज्य संघटनांनी कोणत्या दोन फेऱ्यांमध्ये खेळायचे, हे परस्पर समन्वयाने ठरवायचे आहे. मात्र, मुल्लानपूरमधील दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर खेळाडूंना स्पष्टपणे सांगण्यात आले की विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभाग ऐच्छिक नसून, किमान दोन सामने खेळणे बंधनकारक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number