BCCI Broadcast Engineer Dies : IPL च्या रणसंग्रामात खळबळ; मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये BCCI च्या इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू

मरिन ड्राईव्ह येथील प्रतिष्ठित 'ट्रायडंट' हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) संबंधित असलेल्या एका ब्रिटिश इंजिनिअरचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

BCCI Broadcast Engineer Dies : IPL च्या रणसंग्रामात खळबळ; मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये BCCI च्या इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू

BCCI Broadcast Engineer Dies :  वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, दक्षिण मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मरिन ड्राईव्ह येथील प्रतिष्ठित 'ट्रायडंट' हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) संबंधित असलेल्या एका ब्रिटिश इंजिनिअरचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे क्रिकेट वर्तुळात आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

कोण होते विल्यम लेग्नफोर्ड?
मृताची ओळख विल्यम लेग्नफोर्ड (William Legnford) अशी पटली असून, ते मूळचे ब्रिटिश नागरिक होते. लेग्नफोर्ड हे बीसीसीआयमध्ये 'ब्रॉडकास्ट इंजिनिअर' म्हणून कार्यरत होते आणि आयपीएलच्या (IPL) कामकाजासाठी ते सध्या मुंबईत वास्तव्यास होते. 24 मार्चपासून त्यांचा मुक्काम ट्रायडंट हॉटेलमधील रूम नंबर 2715 मध्ये होता. 29 मार्च रोजी सामना संपल्यानंतर ते रात्री आपल्या खोलीत परतले होते.

मास्टर चावीने उघडला दरवाजा; रूममध्ये आढळला मृतदेह
30 मार्च रोजी हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र रूममधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय बळावल्याने हॉटेल व्यवस्थापनाने अखेर मास्टर चावीच्या साहाय्याने दरवाजा उघडला. यावेळी लेग्नफोर्ड हे खोलीत मृतावस्थेत आढळले. तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, मात्र तपासणीअंती त्यांनी लेग्नफोर्ड यांना मृत घोषित केले.

पोलीस तपास आणि मृत्यूचे गूढ
मरिन ड्राईव्ह पोलिसांनी या प्रकरणी 'आकस्मिक मृत्यू'ची (ADR) नोंद केली असून तपास सुरू केला आहे. विल्यम यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की यामागे काही वेगळे कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, पोलीस हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि लेग्नफोर्ड यांच्या शेवटच्या हालचालींची कसून चौकशी करत आहेत.

हेही वाचा – IPL 2026 RR vs CSK : ज्या टीमला चॅम्पियन केलं, तिला डोळ्यासमोर हरताना पाहून जडेजा भावूक, VIDEO Viral

विजयाच्या आनंदावर विरजण
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने तब्बल 13 वर्षांचा दुष्काळ संपवून विजय मिळवला होता. या विजयाचा आनंद साजरा होत असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बीसीसीआयच्या तांत्रिक पथकातील एका सदस्याचा असा आकस्मिक मृत्यू झाल्याने आयपीएल प्रशासनानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number