Shah Rukh Khan: बॉलीवूडनंतर क्रिकेटमध्येही किंग! KKR साठी शाहरुख खानचा मोठा प्लॅन

केकेआर संघाच्या मालकीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. शाहरुख खान चार हजार कोटींची डील करून संघावर जवळपास पूर्ण नियंत्रण मिळवणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Shah Rukh Khan: बॉलीवूडनंतर क्रिकेटमध्येही किंग! KKR साठी शाहरुख खानचा मोठा प्लॅन

Shah Rukh Khan:आयपीएलमधील दिग्गज संघ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) बाबत एक मोठी आणि चर्चेत असलेली घडामोड समोर आली आहे. बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आता केकेआरच्या मालकीसंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. चार हजार कोटी रुपयांपर्यंत जाणारी ही डील आयपीएलपूर्वीच पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केकेआर हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली, तर 2024 मध्ये श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत केकेआरने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. सातत्यपूर्ण कामगिरी, आक्रमक खेळ आणि मजबूत संघबांधणीमुळे केकेआरची ब्रँड व्हॅल्यू गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे.

सध्या केकेआरच्या मालकीत शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि उद्योगपती जय मेहता यांचा सहभाग आहे. रेड चिलीजकडे ५५ टक्के, तर जय मेहता यांच्याकडे ४५ टक्के हिस्सा आहे. मात्र आता या मालकी रचनेत मोठा बदल होण्याची चिन्हं दिसत आहेत.

हेही वाचा: WPL 2026 : RCB ला मोठा धक्का ! एलिस पेरी आणि ॲनाबेल सदरलँडची स्पर्धेतून माघार, 'या' भारतीय खेळाडूला मिळाली संधी

मिळालेल्या माहितीनुसार, जय मेहता यांनी आपला मोठा हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा उद्देश केवळ 10 टक्के हिस्सा स्वतःकडे ठेवण्याचा होता. मात्र हा हिस्सा बाहेरील गुंतवणूकदाराला विकला जाऊ नये, यासाठी शाहरुख खान स्वतः पुढे सरसावल्याचे समजते. परिणामी, जय मेहता यांचा तब्बल 35 टक्के हिस्सा शाहरुख खान खरेदी करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

ही डील पूर्ण झाल्यास शाहरुख खानकडे केकेआरचा जवळपास 90 टक्के हिस्सा असेल. म्हणजेच केकेआरवर जवळपास संपूर्ण नियंत्रण शाहरुख खानकडे येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या व्यवहाराची किंमत सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या आसपास असू शकते. आयपीएलच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि फ्रँचायझींच्या वाढलेल्या बाजारमूल्यामुळे ही रक्कम चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा: T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर; 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

या निर्णयामुळे केकेआरच्या भविष्यातील धोरणांवर शाहरुख खानचा प्रभाव अधिक वाढणार आहे. संघबांधणी, ब्रँड विस्तार, आंतरराष्ट्रीय लीग्समधील गुंतवणूक आणि व्यावसायिक करार याबाबत नवे निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मानले जात आहे.

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच ही डील पूर्ण झाली, तर केकेआरच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी बातमी ठरणार आहे. शाहरुख खानचा हा धाडसी निर्णय केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून, आयपीएलमधील व्यावसायिक गणितही बदलू शकतो. त्यामुळे येत्या काळात केकेआर आणि शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी असणार, हे नक्की.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number