IND VS ENG 5th T20 : इंग्लंडविरुद्ध नामुष्की टाळण्यासाठी श्रेयस अय्यरचा मास्टर प्लॅन; प्लेइंग-11 मध्ये होणार संजू सॅमसनचे पुनरागमन?

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 0-3 अशा पिछाडीवर असून, अखेरच्या सामन्यात विजय मिळवत किमान पराभवाचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.<br/>

IND VS ENG 5th T20 : इंग्लंडविरुद्ध नामुष्की टाळण्यासाठी श्रेयस अय्यरचा मास्टर प्लॅन; प्लेइंग-11 मध्ये होणार संजू सॅमसनचे पुनरागमन?

IND VS ENG 5th T20 :  भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील अंतिम आणि 5 वा सामना 11 जुलै रोजी साऊथॅम्प्टन येथे रंगणार आहे. या मालिकेतील आतापर्यंतचे चित्र भारतासाठी निराशाजनक ठरले असून, झालेल्या 4 सामन्यांपैकी 3 सामने जिंकत इंग्लंडने मालिका आधीच आपल्या नावावर केली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 0-3 अशा पिछाडीवर असून, अखेरच्या सामन्यात विजय मिळवत किमान पराभवाचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

फलंदाजांची अपयशी कामगिरी चिंतेचा विषय

संपूर्ण मालिकेत भारतीय फलंदाजी अपेक्षेप्रमाणे चमकू शकलेली नाही. सलामीवीर वैभव सूर्यवंशी, यष्टीरक्षक ईशान किशन, शिवम दुबे आणि उपकर्णधार तिलक वर्मा या प्रमुख फलंदाजांना सातत्याने मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे अंतिम सामन्यापूर्वी संघ व्यवस्थापन प्लेइंग 11 मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे.

गोलंदाजीही ठरली निष्प्रभ

दरम्यान, मँचेस्टर येथे झालेल्या 4 थ्या टी-20 सामन्यात भारताने उभारलेले 159 धावांचे लक्ष्य इंग्लंडने केवळ 1 विकेट गमावत 14 व्या षटकात सहज गाठले. या सामन्यानंतर भारतीय गोलंदाजीच्या प्रभावीपणावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. फलंदाजीबरोबरच गोलंदाजांनाही अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे संघ व्यवस्थापनासमोर योग्य संयोजन निवडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

वैभव सूर्यवंशीला विश्रांती, संजू सॅमसनला संधी?

युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीला या मालिकेत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्याने 3 डावांत केवळ 42 धावा केल्याने अंतिम सामन्यात त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी अनुभवी संजू सॅमसनला सलामीची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सॅमसनच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल, असा विश्वास संघ व्यवस्थापनाला आहे.

तिलक वर्मा आणि सुंदर यांच्यावरही टांगती तलवार

उपकर्णधार तिलक वर्मालाही अंतिम सामन्यात स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. मालिकेतील 4 डावांत त्याच्या नावावर अवघ्या 51 धावा जमा झाल्याने त्याच्या निवडीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरलाही अंतिम संघातून बाहेर बसावे लागू शकते. त्याऐवजी वेगवान गोलंदाजी मजबूत करण्यासाठी सूर्यांश शेडगेला संधी मिळण्याची शक्यता आहे. शेडगेने आयर्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात 1 धाव करत 1 विकेटही घेतली होती.

हेही वाचा – Glasgow Commonwealth Games: नीरज चोप्राच्या नेतृत्वाखाली ॲथलेटिक्सचे सर्वात मोठे पथक; 126 खेळाडू ग्लासगोला होणार रवाना

भारताची संभाव्य प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, तिलक वर्मा, अक्षर पटेल, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंह, प्रिन्स यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा अंतिम सामन्यासाठी संभाव्य संघात समावेश असू शकतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number